नागपूर - जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली आहे. काल (30 मे) 357 नवीन रुग्णांची भर पडली आहे. नागपूर जिल्ह्यात 1 हजाराच्यावर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, 1 लाख 27 हजार 163 रुग्ण 30 दिवसात बरे झाले आहेत.
13 रुग्णांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यात रविवारी (30 मे) 14 हजार 37 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 357 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात शहरी भागात 220, तर ग्रामीण भागातील 132 बाधित रुग्ण आढळून आले. 13 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. यामध्ये शहरी भागात 5, ग्रामीण भागात 3 तर जिल्हाबाहेरील 5 जण कोरोनामुळे दगावले आहेत. 1041 जणांपैकी शहरात 567 तर ग्रामीणमध्ये 474 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 2273 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, 4 हजार 508 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
4 लाख 58 हजार 613 कोरोनामुक्त
दुसऱ्या लाटेत मे महिन्यात 1 लाख 27 हजार 163 जणांनी एका महिन्यात कोरोनावर मात केली. यात सक्रिय रुग्णसंख्या घटून 6 हजार 781 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 74 हजार 286 जण रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. यातून 4 लाख 58 हजार 613 जण कोरोनामुक्त झाले. नागपूर जिल्ह्याचा कोरोना मृतांचा आकडा 8892 वर जाऊन पोहोचला आहे. 2572 रुग्ण मे महिन्याच्या 30 दिवसात दगावले आहेत. नागपूरात सध्या रिकव्हरी रेट 96.70 टक्केवर जाऊन पोहोचला आहे.
नागपूरचा पॉझिटीव्हीटी दर 2.5 टक्के
पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यात 2 हजार 580 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात 1 हजार 220 जण नव्याने कोरोनाबाधित मिळून आले आहेत. पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यातील 27 जण कोरोनामुळे दगावले. यात बाधितांच्या तुलेनेत 1 हजार 360 अधिकचे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात नागपूरचा पॉझिटीव्हीटी दर 2.5 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या पॉझिटीव्हीटी दरात घसरण होऊन 5.60 टक्केवर आला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट - राज्यात रविवारी 18 हजार 600 कोरोनाबाधितांची नोंद, 402 जणांचा मृत्यू