ETV Bharat / state

शरीराचे तापमान मोजण्यासाठी नागपूरच्या डीसीपी कार्यालयात नवा प्रयोग

author img

By

Published : Sep 17, 2020, 3:23 PM IST

Updated : Sep 17, 2020, 4:01 PM IST

कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत नागपूर येथील एक तरुणाने शरीराचे तापमाप ओळखणारे यंत्र तयार केले आहे. या यंत्राचा नागपूर येथील पोलीस उपायुक्त कार्यालयात प्रायोगित तत्त्वावर वापर करण्यात येत आहे.

body temperature measure machine
शरीराचे तापमान ओळखणारे यंत्र

नागपूर - कोरोनाचा वाढता धोका पाहता शहरातील पोलीस उपायुक्त (डीसीपी) कार्यालयात शरीराचे तापमान मोजण्यासाठी नवा प्रयोग करण्यात आला आहे. थर्मल थर्मामिटरचा वापर करत सेंसरच्या माध्यमातून शरीराचा तापमान ओळणारे यंत्र प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आला आहे.

शरीराचे तापमान मोजण्यासाठी नागपूरच्या डीसीपी कार्यालयात नवा प्रयोग

नागपूरातील एका तरुणाने ही संकल्पना वाहतूक पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या समोर सादर केली होती. त्यात पोलीस उपायुक्तच्या कल्पनेनुसार हे यंत्र विकसित करण्यात आले आहे. सध्या हे यंत्र प्रायोगिक तत्वावर वाहतूक विभागाच्या चालान तडजोड विभागात लावण्यात आले आहे. या सेंसरव्दारे शरीराचे अधिक तापमान असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कातपासून बचाव करता येऊ शकतो.

सध्या सर्वच शासकीय कार्यालयात येणाऱ्या व्यक्तीचे थर्मल स्क्रिनिंग करत तापमान तपासले जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध प्रयोगही केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरातील वाहतूक पोलीस विभागाकडून शरीराचे तापमान मोजण्यासाठी नवा प्रयोग करण्यात आला आहे. थर्मल थर्मामिटर सेंसरच्या माध्यमातून शरीराचे तापमान दर्शविणारे यंत्र बसविण्यात आले आहे. सध्या हे यंत्र प्रायोगिक तत्त्वावर आहे. याचा फायदा झाला तर पुढे सर्वच पोलीस विभागात हे यंत्र बसण्यात येणार आहे.

हेही वाचा - देशातील कोरोना रुग्णांची संख्या ५१ लाखांवर; एकूण चाचण्यांनी ओलांडला सहा कोटींचा टप्पा...

नागपूरचे वाहतूक पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांना एका तरुणाने ही संकल्पना सांगितली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त आणि वाहतूक पोलीस विभागाने हा प्रयोग केले आहे. या सेंसरमध्ये थर्मामीटर बसविण्यात आले आहे. त्यात शरीराचे तापमान दर्शविले जाते. त्यानुसार अधिक तापमान असणाऱ्या व्यक्तीला दारवरच थांबवल्या जाते. शिवाय तापमान सुरळीत असेल तरच सेंसरच्या समोर असलेले बॅरिकेड खुलते. या यंत्रामुळे अधिक तापमान असणाऱ्या व्यक्तीपासून बचाव करता येऊ शकतो. नागपूरात दिवसभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे येथे चालान भरण्यासाठी येत असतात. त्यामुळे चालान तडजोड विभागाच्या दाराजवळच हे सेंसर लावण्यात आले आहे. चालान भरण्यापूर्वी सेंसरद्वारे व्यक्तीचे तापमान मोजले जाते. त्यानंतरच त्या व्यक्तीला समोर प्रवेश दिला जातो. त्यामुळे या सेंसरचा हा प्रयोग यशस्वी झाला तर सगळ्या विभागात कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी सांगितले.

पोलीस विभागातील टेक्निकल टिमच्या संयुक्त कार्यामुळे हे सेंसर तयार करण्यात आले आहे. या यंत्राच्या मदतीने ३८ डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान असणाऱ्या व्यक्तीचा प्रवेश नाकारल्या जातो. त्यामुळे या यंत्राचा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी फायदा होवू शकतो, अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. त्यामुळे वाहतूक पोलीस विभागाचा हा नवा प्रयोग यशस्वी झाला तर पोलीस विभागाला मोठी मदत होईल, अशी मत पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना व्यक्त केले.

Last Updated : Sep 17, 2020, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.