ETV Bharat / state

नागपुरात आठ नवे कोरोना पॉझिटिव्ह, २५ जण कोरोनामुक्त, जिल्ह्यातील एकूण संख्या १३२०

आज नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत ८ ने वाढ झाली. तर, २५ रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नागपुरातील कोरोना बाधीत रुग्णांची सांख्य आठ ने वाढली

author img

By

Published : Jun 24, 2020, 3:31 PM IST

Updated : Jun 24, 2020, 3:57 PM IST

नागपूर - नागपुरात आठ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ हजार ३२० झाली आहे. यामध्ये १६८ रुग्ण हे नागपूरच्या ग्रामीण भागातील आहेत तर, ४९ रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यातील हेत.

गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी-जास्त होत असल्याने धोका कमी झाला नसल्याचे अधोरेखित झाले आहे. एकाद्या दिवशी कोरोना रुग्ण संख्येचा ब्लास्ट होतो. त्यानंतर मात्र, पुढील आठ दिवस आकडे नियंत्रणात येत असल्याचे चित्र सध्या नागपुरात उभे आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज मिळण्याच्या प्रमाणात सुद्धा चढ-उतार बघायला मिळतो आहे.

आज नागपुरात २५ रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९२८ इतकी झाली आहे. यामध्ये ८२ बरे झालेले रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. याशिवाय नागपूरात २१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी २ रुग्ण नागपूर ग्रामीणचे आहेत तर, ८ रुग्ण हे दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत. सध्या नागपुरच्या मेयो, मेडिकल, एम्स आणि मिलिटरी रुग्णालयात ३७१ रुग्णांवर उपचार सुरू असून लवकरच डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या पुढे जाणार आहे.

Last Updated : Jun 24, 2020, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.