नागपूर - कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे पुन्हा नव्याने 31 नियमित रुग्णालये आता डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पीटलमध्ये (डीसीएच) परावर्तीत होणार आहे. यासंदर्भातील एक आदेश नागपूर महानगरपालिकेने निर्गमित केला आहे. यानुसार २४ तासांत संबंधित रुग्णालयांकडून सदर रुग्णालय कोव्हिड रुग्ण दाखल करुन सज्ज असल्याबाबतचा अहवाल मागविला आहे. त्यामुळे आता डीसीएच रुग्णालयांची संख्या एकुण 62 झाली आहे.
या आदेशात नमूद केल्यानुसार, 24 तासांत रुग्णालयांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील 48 तासांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संबंधित रुग्णालयांना भरती करता येतील. जे रुग्ण दाखल होतील. त्यांच्यावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करण्यात यावा, असेही आदेशात नमूद आहे. तसेच दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा रिअल टाईम अहवाल मनपाच्या पोर्टलवर नियमित अद्यावत करणे अनिवार्य राहील.
नागपुरमधील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 हजार इतकी आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांना बेडच उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. त्यातच दिवसागणिक रुग्ण संख्या वाढत असल्याने नागपूर शहरात आणि जिल्ह्यात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे आता शहरातील आणखी
31 नियमित रुग्णालये आता डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पीटलमध्ये परावर्तीत करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
जी रुग्णालये आता पूर्णत: कोव्हिड रुग्णालय होणार आहेत, त्यांची नावे पुढीलप्रमाणे -
01) एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटर
02) श्रीमती निंबुनाबाई तिरपुडे हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर
03) अवंती इंस्टिट्युट ऑफ कॉर्डिऑलॉजी प्रा.लि.
04) व्हिनस क्रिटीकल केअर हॉस्पिटल
05) शतायु हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर
06) क्रिसेंट हॉस्पीटल ॲण्ड हार्ट सेंटर
07) डॉ. दळवी चिल्ड्रन हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर
08) मिडास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
09) अर्नेजा इंस्टिट्यूट ऑफ कॉर्डिऑलॉजी
10) ट्रीट मी हॉस्पिटल
11) श्री हॉस्पिटल ॲण्ड क्रिटीकल केअर
12) प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल हॉटेल
13) खिदमत हॉस्पिटल
14) स्पंदन हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटर
15) क्रिटीकेअर हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर
16) सनफ्लॉवर हॉस्पिटल
17) अश्विनी किडनी ॲण्ड डायलेसीस सेंटर
18) ट्रिनीट हॉस्पिटल
19) क्रिटीकल केअर युनिट
20) गिल्लुरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
21) गेटवेल हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट
22) क्रिम्स हॉस्पीटल
23) आयकॉन हास्पीटल
24) सेनगुप्ता हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट
25) शुअरटेक हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर लि.
26) आनंद हॉस्पिटल
27) केशव हॉस्पिटल
28) आस्था क्रिटीकल केअर ॲण्ड अवतार मेहरबाबा हॉस्पिटल