नागपूर - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी थंडावला आहे. मात्र, त्यानंतर गैरप्रकार घडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने मतदानाच्या आदल्या दिवशी जमावबंदीचे कलम (कलम १४४) लागू केले आहे.
हेही वाचा - वरळी मतदारसंघात चार कोटींची संशयास्पद रक्कम जप्त
राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २१ ऑक्टोबरला होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात संवेदनशील भागात नाका बंदी आणि कडोकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. सार्वत्रिक प्रचार बंद असला तरी घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे. मात्र, पाच पेक्षा जास्त व्यक्ती प्रचारकरिता जाऊ शकत नाहीत. तसेच कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी निमलष्करी दलाचे ६०० जवान आणि ९ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा - महात्मा गांधी हत्येचा खटला पुन्हा सुरू करावा - सुब्रमण्यम स्वामी