नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रकरणात समोर आलेल्या सात प्राध्यापकांना बनावट लैंगिक शोषण प्रकरणात (RTMNU sexual abuse case) अडकवून, लाखो रुपये वसूल केल्याच्या घटनेवर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंपूर्ण प्रकरणात विद्यापीठाचे कुलगुरू आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांना बोलावून आढावा अहवाल मागणार असल्याची माहिती नीलम गोर्हे (Neelam Gorhe reacts) यांनी दिली आहे.
तपास होणं गरजेचं : जे प्रकरण समोर आले आहे ते गंभीर आहे. तुमच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार आली आहे, अशा आशयाची भीती दाखवून काही प्राध्यापकांची फसवणूक करण्यात आली आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली. मात्र मी जी माहिती घेतली माहिती आहे, त्याप्रमाणे या सातही प्राध्यापकांनी जर काही चूक केली नव्हती, तर त्यांनी असे भीतीपोटी लाखो रुपये का दिले ?, असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. ते खंडणी मागणाऱ्या प्राध्यापकाला न घाबरता पोलिसांकडे तक्रार करू शकत होते. मात्र त्यांनी घाबरून खंडणी का दिली ? याचाही विचार होणे गरजेचा आहे. या प्रकरणी सखोल तपास होणे गरजेचे आहे. यापूर्वी ही नागपूर विद्यापीठ मध्ये काही मुलींचे शोषण होऊन पैसे वसूल करून प्रकरण दाबले गेले का, याचा तपास होणं गरजेचे आहे असं त्या म्हणाल्या आहेत.
तपास यंत्रणांनी निरपेक्षपणे काम केले पाहिजे : आपण जेव्हा सार्वजनिक जीवनात असतो, तेव्हा अनेक मतभेद होतात. राजकीय दृष्ट्या कायद्याचा गैरवापर होत आहे म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा (resignation of Jitendra Awad) दिला, असे दिसत आहे. माझा आग्रह आहे की, त्यांनी राजीनामा देऊ नये. आमची मुख्यमंत्री यांना विनंती आहे की, त्यांनी वस्तुस्थिती तपासून निर्णय घेतले पाहिजे. जी घटना घडली त्याबाबत महिलेला काय वाटतं हे तपासून घेतलं जातं आणि जर पोलिसांना तपासात तथ्य आढळले नाही. तर त्या गुन्ह्याची बी समरी म्हणजे क्लोजर करता येते. गर्दीमध्ये अनेकदा लवकर निघण्याच्या प्रयत्नात असा प्रकार होतो. जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः सांगितले आहे की, माझा विनयभंगाचा हेतू नव्हता. त्यामुळे तपास यंत्रणांनी निरपेक्षपणे काम केले पाहिजे असं मला वाटतं.