नागपूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामकाजाची निविदा काढण्यात आली. त्यानंतर ज्या प्रकारे काम करण्याचे आदेश देण्यात आले यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. तसेच कॅबच्या अहवालामधून देखील ते स्पष्ट झाले आहे. चंद्रकांत पाटील त्यावेळी मंत्री होती. त्यांनीच या प्रकल्पामध्ये हात धुतला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
आघाडी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा निश्चित केली होती. त्यानंतर भाजपने पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम घेतला. त्यानंतर वरिष्ठ अभियंत्यांनी कामाचे आदेश देण्याला नकार दिला होता. मात्र, भाजप सरकारने कनिष्ठ अभियंत्याकडून कामाचे आदेश घेण्यात आले. बेकायदेशीररित्या स्मारकाराचा आकार कमी करण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला. याबाबत चौकशी करण्याची विनंती सरकारला करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच चंद्रकांत पाटील यांनी या स्मारकाच्या कामकाज प्रक्रियेत पैसे खाल्ले असल्याचे आम्ही सिद्ध करून दाखवू, असे नवाब मलिक म्हणाले.
हे वाचलं का? - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थिगिती देण्याचा सरकारचा विचार - चंद्रकांत पाटील