नागपूर - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचे निकाल बुधवारी जाहीर झालेत. नागपूरमध्ये काँग्रेसचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने सत्ता राखण्याबरोबरच अधिकच्या जागांवर विजयी होण्यात यश मिळवले आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालामध्ये एकूण 16 जागेपैंकी झालेल्या जागेमध्ये काँग्रेसने 09, राष्ट्रवादी 02, भाजप 03 आणि शेकाप आणि गोंडवाना प्रत्येकी 01 जागा मिळवली. पण राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला मात्र गेल्यावेळची एक जागा तर गमवावी लागलीच शिवाय 11 पैकी एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. मात्र, या निवडणुकीदरम्यान राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख बेपत्ता असल्याने याचा फटका राष्ट्रवादीला बसला असल्याची चर्चा आहे.
नेतृत्त्व मात्र केदार यांचेच -
'ईडी'चा ससेमीरा सुरू असल्याने माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख नसल्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या ठिकाणी भाजपा अधिक फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा गटाची जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता असल्याने ती टिकवण्यासाठी मात्र सर्वच स्तरावर त्यांनी मोर्चा सांभाळला. यात शिवसेना या निवडणुकीत सोबत नसली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणूक सोबत लढवली होती, पण यावर नेतृत्त्व मात्र केदार यांचेच राहिले. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कथीत 100 कोटीच्या आरोपांनंतर कुठे आहेत, हे कोणालाच कळू शकले नाही. त्यामुळे पालकत्व स्वीकारणारे जिल्ह्यातच उपस्थित नसल्याने निवडणुकीत पक्षाचे उमेदवार यांच्याकडे आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नव्हता. पण असे असले तरी निवडणुकीसाठी खर्च असो की, प्रचाराची धुरा सांभाळण्याचे नियोजन राष्ट्रवादी पक्षाकडे नव्हते. त्यामुळे त्या ठिकाणी भाजप डोळा ठेवून होता.
हेही वाचा - कोल्हापुरातील अजित पवारांच्या बहिणीच्या घरासह कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे