ETV Bharat / state

Naxal Girl Passed 12th : जहाल नक्षली ते 12 वी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी, जाणून घ्या राजुला हिदामीची संघर्षकथा

राजुला हिदामी ही 15 वर्षाची मुलगी नक्षलवादी चळवळीत काम करत होती. राजुलाच्या नावावर तब्बल 6 गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या प्रयत्नांनी राजुलाने आत्मसमर्पण करत बंदूक खाली टाकली. आता राजुलाने नवा अध्याय लिहिला असून बारावीत तिने यश संपादन केले आहे.

Naxal Girl Passed 12th
राजुला हिदामी
author img

By

Published : May 26, 2023, 10:51 AM IST

नागपूर : बारावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे, मात्र या यशात राजुला हिदामी या विद्यार्थिनीने पास होत 45.83 टक्के गुण मिळवले. मात्र या 45.83 टक्के गुण मिळवण्यामागचा संघर्ष खूप मोठा आहे. राजुला हिदामी या 15 वर्षाच्या आदिवासी मुलीने गडचिरोली गोंदियात मोठी दहशत निर्माण केली होती. इतक्या कमी वयात राजुला हिदामीच्या नावावर तब्बल 6 गंभीर गुन्ह्याची नोंद होती. मात्र तिच्या जीवनात संदिप आटोळे या पोलीस अधिकाऱ्यामुळे प्रकाश आला आणि तिने हातातील शस्त्र खाली टाकले. पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्यानंतर राजुलाने पुन्हा शिक्षणाची कास धरली. तिच्या यशाची ही संघर्षगाथा खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.

कोण आहे राजुला हिदामी : राजुला हिदामी ही गोंदिया आणि गडचिरोली परिसरातील जहाल नक्षलवादी होती. वयाच्या सहाव्या वर्षीच राजुलावर तब्बल 6 गुन्हे दाखल होते. यात पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार गोळीबार प्रकरणासह लुटमार आणि स्फोटांच्या घटनांचाही समावेश आहे. वयाच्या 15 व्या वर्षीच राजुला नक्षल चळवळीत का काम करत होती, याचे कोडे पोलिसांनाही उलगडले नव्हते.

पोलीस अधीक्षक संदिप आटोळेंनी स्वीकारले पालकत्व : राजुला हिदामी या 15 वर्षाच्या मुलीची नक्षलग्रस्त परिसरात चांगलीच दहशत पसरली होती. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तर राजुलाचा चांगलाच दबदबा होता. मात्र गोंदिया पोलीस दलाच्या अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संदिप आटोळे यांनी या प्रकरणी चांगलेच लक्ष घातले. संदिप आटोळे यांनी राजुलाचे मनपरिवर्तन करण्यात यश मिळवले. त्यांच्याच प्रयत्नांनी राजुलाने 2018 मध्ये पोलिसांपुढे आत्मसमर्पण करत बंदुक खाली ठेवली. त्यानंतर राजुलाने शिक्षणाची कास धरली. संदिप आटोळे यांनी राजुलाचे पालकत्व स्विकारुन तिच्या शिक्षणाचा सगळा भार उचलला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच राजुला बारावीच्या परीक्षेत पास झाली आहे. आगामी काळातही राजुलाला मदत करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक संदिप आटोळे यांनी उचलली आहे. राजुलाने मिळवलेल्या यशाबद्दल आपल्याला आनंद झाला आहे. तिला केलेल्या मदतीचे समाधान असल्याची माहितीही त्यांनी ईटीव्ही भारत प्रतिनिधींसोबत बोलताना दिली आहे.

बापाचा मृत्यू, आईने केले दुसरे लग्न : राजुलाच्या वडिलांचे निधन झालेले आहे, तर तिच्या आईने दुसरा विवाह केला आहे. त्यामुळे राजुलाला जवळचे असे कोणीच नव्हते. त्यातच नक्षलवादी चळवळीत ओढलेल्या राजुलाचे नातेवाईकही सुटले होते. मात्र पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी या मुलीला मायेचा आधार दिला. आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांनीच राजुलाच्या शिक्षणाची सगळी व्यवस्था केली. या कामात त्यांना त्यांच्या काही मित्रांचीही खूप मदत झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी दिली. सध्या राजुला संदीप आटोळे आणि त्यांच्या कुटूंबीयांना आपले कुटंब मानत आहे. आपल्या मदतीमुळे नक्षलग्रस्त चळवळीतून बाहेर पडत राजुलाने यश मिळवले याचा मोठा आनंद असल्याचे समाधानही संदीप आटोळे यांनी यावेळी व्यक्त केले.

राजुलाला व्हायचे आहे पोलीस दलात भरती : नक्षल चळवळीत अनेक महिला आणि मुलींना फसवणूक करुन ओढले जाता असल्याचा आरोप करण्यात येतो. असाच प्रकार राजुलासोबतही घडला होता. मात्र पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि त्यांच्या पथकाच्या अथक प्रयत्नामुळे राजुलाने आत्मसमर्पण केले. आता राजुला नक्षल चळवळीपासून मुक्त झाली असून ती सर्वसामान्य मुलींसारखेच आयुष्य जगत आहे. एखादी मुलगी 15 वर्षी नक्षल चळवळीत जाऊन ती पुन्हा शिक्षणाच्या वाटेवर येत बारावी पास होण्याची ही पहिलीच घटना असावी, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान राजुलाला पोलीस दलात भरती होण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -

  1. Samruddhi Mahamarg Inauguration: आता फक्त 6 तासात नाशिककरांच्या दारी येणार नागपूरची संत्रा बर्फी, समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्याचे आज उद्धाटन
  2. Shiv Sena Want 22 Lok Sabha Seat : लोकसभेसाठी शिंदे गटाचा प्लान ठरलाय, 22 भाजपला आणि 22 जागांव शिंदे गट लढणार निवडणूक
  3. President On Tribal Women : आदिवासी महिला असल्याचा अभिमान आहे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.