ETV Bharat / state

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती असल्याचा भाजपचा आरोप प्रशासनाने फेटाळला - चंद्रशेखर बावनकुळे न्यूज

नागपूर जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत भाजपा नेत्यांनी केलेले आरोप नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत. पूरस्थितीपूर्वी नागरिकांनी अलर्ट करण्यात आले होते, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले आहेत.

chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निवेदन
author img

By

Published : Aug 31, 2020, 10:57 PM IST

Updated : Sep 1, 2020, 8:35 AM IST

नागपूर - पूर्व विदर्भातील 4 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून त्यासाठी प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. प्रशासनाने वेळीच पावसाचे अलर्ट दिले नसल्याचे आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात जीवितहानी झाल्याची एकही घटना घडली नसल्याचे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी म्हटले आहे. याद्वारे त्यांनी भाजपा नेत्यांनी केले आरोप फेटाळून लावले आहेत.

भाजपा नेत्यांचे आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

दोन दिवसांपूर्वी नागपूरसह पूर्व विदर्भात आलेल्या पुराने हाहाकार माजवला आहे. मध्यप्रदेश येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील नद्याध्ये अचानक आलेल्या पुरामुळे १० हजार कुटुंबाच्या घराचे नुकसान झाले आहे. तर एक लाख एकरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने लोकांना वेळीच अलर्ट दिले नाहीत म्हणून हे नुकसान झाले आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला होता. शासनाने आता लवकर पंचनामे करत हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे आणि काही आमदारांनी नागपूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत केली होती.

हेही वाचा-नागपुरातील पूर ओसरू लागला; परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने नागरिकांना दिलासा

जिल्ह्यातील उमरेड, कुही, कामठी, कन्हान आणि पारशिवणी या भागांना पुराचा फटका बसलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील तोटलडोह आणि नवेगाव खैर या जलाशयांमध्ये आधीच जल साठा मुबलक होता. मध्यप्रदेश येथील चौराई धारणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील दोन्ही धरणांचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आल्याने नागपूर जिल्ह्याला पुराचा फटका सहन करावा लागला. या संदर्भांत प्रशासनाने वेळीस खबरदारीच्या उपाय योजना केल्यामुळेच आज जिल्ह्यात एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा करत जिल्हाधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांचा दावा फेटाळून लावला आहे.

संपूर्ण जिल्ह्यात ४८४४ कुटुंब पुरामुळे बाधित झाले आहेत. तर २७ हजार लोकांची ४८ निवारागृहांमध्ये व्यवस्था करण्यातआली आहे. प्राथमिक अंदाजानुसार १७८०० हेक्टर शेती बाधित झाली आहे. सर्वांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली आहे.

Last Updated : Sep 1, 2020, 8:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.