नागपूर - महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, अशा वल्गना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Karnataka Chief Minister Basavaraj Bommai ) करत आहेत. सीमावाद प्रश्नी कर्नाटक सरकार दररोज दादागिरी करत आहे. केंद्र सरकार आणि भाजपच्या आशीर्वादामुळेच कर्नाटक सरकार ( Karnataka Government ) महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचे मत काँग्रेसचे आमदार नाना पटोले ( Nana Patole Criticized To Central Government And Bjp) यांनी व्यक्त केले. कर्नाटकच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर ( Opposition Leader Protest steps of Vidhan Bhavan ) विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
कर्नाटकविरोधात ईडी सरकारची अळिमिळी गुपचिळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Union Home Minister Amit Shah ) यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही कर्नाटक सरकारकडून ( Karnataka Government) जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकली जात आहे. पण कर्नाटकच्या या दादागिरीसमोर राज्यातील ईडी सरकार मात्र अळिमिळी गुपचिळी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole Criticized To Central Government And Bjp ) यांनी आज विधानभवनात केली आहे.
सर्व केंद्र सरकारच्या आशिर्वादानेच चालले आहे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात ( Maharashtra Karnataka Border Dispute ) केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. पण केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही. कर्नाटक सरकार (Karnataka Government) जाणीवपूर्वक दादागिरी करत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व केंद्रातही भारतीय जनता पक्षाचेच सरकार आहे. पण कर्नाटकची दंडेलशाही ते मोडून काढू शकत नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक झाली होती. पण त्यानंतरही कर्नाटककडून अरेरावी केली जात आहे. हे सर्व केंद्र सरकारच्या आशिर्वादानेच चालले आहे. महाराष्ट्र तोडण्याचा भाजप व नरेंद्र मोदी यांचा हा डाव आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील ईडीचे सरकार डरपोक आहे. कर्नाटक सरकारला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज असल्याचेही नाना पटोले ( Nana Patole Criticized To Central Government And Bjp ) यांनी यावेळी सांगितले.
कर्नाटकच्या दादागिरी विरोधात घोषणाबाजी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आजही महाविकास आघाडीने ( MVA Protest Against Government ) शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात सकाळी घोषणाबाजी केली. कर्नाटकच्या दादागिरी विरोधातही बोम्मईचा सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. नागपुरातील भूखंड घोटाळ्याप्रकरण, महापुरुषांचा अपमान या मुद्द्यांवरही घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी राजीनामा द्यावा, अशाही घोषणा देण्यात आल्या