ETV Bharat / state

Nagpur Youngster Made Sports Car : भंगारातून बनविली स्पोर्ट्स रेसिंग कार; नागपुरच्या तरुणाची कल्पना - स्पोर्ट्स रेसिंग कार नागपूर

नागपुरातील एका ध्येयवेड्या तरुणाने भंगारातील सामानातून स्वतःची कार तयार केली आहे. ( Nagpur Youth Made Sports Car ) विशेष म्हणजे ही कार देखील साधीसुधी नसून चक्क फॉर्म्युला वन रेसमध्ये ( Formula One Racing Car Nagpur ) धावणारी स्पोर्ट कार आहे.

Nagpur Youngster Made Formula Sports racing car by using scrap
भंगारातून बनविली फॉर्म्युला वन रेसिंग कार; नागपुरच्या तरुणाची कल्पना
author img

By

Published : Jan 29, 2022, 1:04 PM IST

Updated : Jan 29, 2022, 1:29 PM IST

नागपूर - स्वप्न तर प्रत्येकजण बघतो. मात्र, बंद डोळ्यांनी बघितले स्वप्न उघड्या डोळ्याने सत्यात उतरण्याची ताकत काहींच्या मनगटात असते. नागपुरातील अशाच एका ध्येयवेड्या तरुणाने भंगारातील सामानातून स्वतःची कार तयार केली आहे. ( Nagpur Youth Made Sports Car ) विशेष म्हणजे ही कार देखील साधीसुधी नसून चक्क फॉर्म्युला वन रेसमध्ये ( Formula One Racing Car Nagpur ) धावणारी स्पोर्ट कार आहे. स्वप्निल काशीनाथ चोपकर असे या तरुणाचे नाव आहे. 26 वर्षीय स्वप्नील नागपुरातील रामेश्वरीच्या पार्वती नगर येथे राहतो.

काही वर्षांपूर्वी स्वप्नीलने स्वतःच्या कामाईने एक तरी कार विकत घेण्याचा स्वप्न बघितलेले होते. परिस्थितीमुळे ते शक्य होऊ शकले नाही म्हणून त्याने भंगारातून कार आणि दुचाकीचे पार्ट्स विकत आणून चक्क फॉर्म्युला वन रेसिंग कराचं तयार करून दाखवली आहे. स्वप्निलला ही कार तयार करताना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर त्याने कशी मात केली हे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारत प्रतिनिधीने आढावा घेतला.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा

सव्वा लाखाची रेसिंग कार -

स्वप्नील हा ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करत असताना त्याला स्वतःची कार तयार करण्याची कल्पना सुचली. नोकरी करताना जमवलेल्या पैशातून त्याने भंगाराच्या दुकानातुन कारचे इंजिन, शॉकअप, चाक, सायलेन्सर अशा अनेक वस्तू गोळा करण्यात सुरुवात केली. कार तयार करण्याचा कोणताही अनुभव नसल्याने स्वपनील अनेक वेळा चुकला. मात्र मार्गदर्शकांनी केलेल्या सूचनांचे पालन करून त्याने अखेर कार तयार करून दाखवली आहे. फॉर्म्युला वन रेसिंग कार तयार करण्यासाठी स्वप्नीलला एक लाख ते सव्वा लाखांचा खर्च आला आहे.

हेही वाचा - Union Budget 2022-23 : धार्मिक तेढ निर्माण करण्यापेक्षा देशाची आर्थिक स्थिती मजबूत करणारे बजेट सादर करा; डॉ. भालचंद्र मुणगेकर

किती मायलेज देणार -

स्वप्नीलने तयार केलेली फॉर्म्युला वन रेसिंग कारमध्ये 800 सीसीचे इंजिन बसवण्यात आले आहे. ती 19चा मायलेज देत आहे. तर सध्या ही कार 140 किलोमीटर प्रतितास धावू शकते, असा दावा त्याने केला आहे. भविष्यात यामध्ये आणखी संशोधन करून स्पीड आणि मायलेज वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

Last Updated : Jan 29, 2022, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.