नागपूर - बहुप्रतिक्षित असलेले नागपुरातील वर्धा-नागपूर मार्गावरिल डबल डेकर पूल लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे. गेल्या काही दिवसापासून या पुलाचे काम सुरू असून येत्या एक महिन्यात हे काम पूर्णत्वास येईल, अशी माहीती मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पुलाच्या बांधकामाची आज नागपूर मेट्रो अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. साधारण साडेतीन किलोमीटर लांबीचा असलेला हा पूल वाहतूक कोंडीच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. शिवाय शहरातील इतरही भागात जाण्यासाठी अंतर्गत पुलांचाही यात समावेश करण्यात आला आहे.
शहरातील महत्वपूर्ण व वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या डबल डेकर पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. यामुळे लवकरच हा पूल वाहतुकीसाठी नियमीत सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे अंतिम निर्णय नॅशनल हायवे अथॉरिटीकडून देण्यात येणार आहे. सध्या या पुलाचे काम नागपूर मेट्रोच्या अखत्यारित सुरू आहे. त्यामुळे मेट्रो विभागाकडून येत्या एक महिन्यात या पुलाचे बांधकाम पूर्ण करून नॅशनल हायवे अथॉरिटीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. शहरातील वर्धा रोडपासून या पुलाची सुरूवात होते. शिवाय हा पूल तीन स्तरांने बनलेला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या दृष्टीने हा पुल माहत्वाचा ठरणार आहे. सोबतच याच पुलाच्या माध्यमातून अंतर्गत मार्गही तयार करण्यात आले आहे. ज्याव्दारे प्रवास करताना वाहन कोंडी होणार नाही. हे संपूर्ण बांधकाम 409 कोटी रूपयाचे असून देशातील सर्वात आगळा वेगळा पूल असल्याची प्रतिक्रिया मेट्रो अधिकारी प्रदिप कोकाटे यांनी दिली आहे. सोबतच पुलाअभावी या भागातील लोकांना वाहतुकीसंबंधित समस्या उद्भवत होत्या. त्या समस्या या पुलामुळे पुढे येणार नाही, असेही कोकाटे यांनी सांगितले. त्याचबरोबर विमानतळावर जाणाऱ्या नागरिकांसाठीही हा पूल महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे नागपूरकरांसाठी हा पुल अत्यंत उपयोगात्मक ठरणार असल्याची माहितीही प्रदिप कोकाटे यांनी दिली.
हेही वाचा - नागपूर महानगर पालिकेचा २ हजार ५०० कोटींचा अर्थसंकल्प सादर