ETV Bharat / state

नागपूर निर्बंधांसह 'अनलॉक' : जाणून घ्या काय आहेत निर्बंध... - nagpur lockdown

कोरोना रुग्णसंख्यावाढीचा मागील अनुभव पाहता शहरात काही निर्बंध कायम ठेवणार असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पालकमंत्र्यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे पत्रकारपरिषेदत माहिती दिली.

नितीन राऊत
नितीन राऊत
author img

By

Published : Jun 6, 2021, 9:05 PM IST

नागपूर - नागपुरात लेवल वन अंतर्गत निर्बंध खुले करण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णसंख्यावाढीचा मागील अनुभव पाहता शहरात काही निर्बंध कायम ठेवणार असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पालकमंत्र्यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे पत्रकारपरिषेदत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, "अत्यावश्यक दुकाने तसेच अत्यावश्यक वगळून इतर दुकाने संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील. यानंतर केवळ हॉटेल-रेस्टॉरंट यांना 50 टक्के क्षमतेसह रात्री दहापर्यंत खुले राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतरत्र दुपारी 5 वाजल्यानंतर सर्व आस्थापने बंद राहणार असून 5 पेक्षा अधिक लोकांना गर्दी करण्याचे निर्बंध कायम असणार आहे. तसेच यासंदर्भात शुक्रवारी पुन्हा आढावा घेऊन पुढील शिथिलतेबाबतचे निर्णय घेतले जाईल".

नागपूर निर्बंधांसह 'अनलॉक'

असे असतील नियम

  • सर्व दुकाने अत्यावश्यक आणि इतर दुकाने सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुले
  • हॉटेल रेस्टॉरंट रात्री 10 पर्यंत 50 टक्के क्षमतेने खुले राहतील
  • स्पोर्ट अ‌ॅक्टिव्हिटी सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 9 सुरू राहणार
  • शासकीय कार्यालये शंभर टक्के उपस्थितीत 5 वाजेपर्यंत खुले राहणार
  • मॉल्स-मल्टिप्लेक्स यांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत 'शो' चालवण्यास परवानगी
  • लग्नसमारंभासाठी शंभर लोकांपर्यंत मर्यादित असणाऱ्या किंवा मंगल कार्याची क्षमता पाहता 50 टक्के या सूत्रानुसार, जे सर्वात कमी असेल त्याचा अवलंब करण्याच्या सूचना असणार आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास तात्काळ दंडात्मक स्वरूपाची कारवाई करून ते मंगल कार्यालय पुढील अनिश्चित काळापर्यंत बंद करण्यात येईल
  • अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त 50 लोकांपर्यंत उपस्थित
  • जीम, सलून, पार्लर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील
  • स्कूल, कॉलेज, कोचिंग, क्लासेस बंद राहतील. मात्र त्यांचे प्रशासकीय काम सुरू राहील
  • सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेने सुरू राहणार (उभे राहून प्रवाशी नेण्यास बंदी)
  • धार्मिक स्थळे मंदिर अंतर्गत मंदिर किंवा ट्रस्टच्या 5 लोकांच्या उपस्थितीत दैनंदिन पूजापाठ आणि स्वच्छतेच्या कामास परवानगी
  • राजकीय व धार्मिक कार्यक्रमावर पूर्णतः बंदी
  • सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात शंभर लोकांची उपस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.