नागपूर - कोरोनाविषयावरुन काहीसी दिलासादायक बातमी आहे. मयो रुग्णालयात गेल्या १४ दिवसांपासून भरती असलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या दोघांआधी आणखी एकाला कोरोना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.
नागपुरात ११ मार्च रोजी पहिला कोरोनाची लागण झालेला रुग्ण सापडला होता. त्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना याची लागण झाल्याचे समोर आले होते. त्या तिघांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याची कोरोनाची टेस्ट पुन्हा घेण्यात आली. तेव्हा त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
पहिल्या बॅच मधील बहुतांश रुग्ण बरे झाल्यानंतर, नागपुरात आणखी ७ रुग्णांची भर पडल्याने नागपूरात एकूण ८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा - 21 दिवसांच्या 'लॉक डाऊन'च्या काळात जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू राहणार- तुकाराम मुंढे
हेही वाचा - #Coronavirus : चिंता वाढली..! नागपूरात कोरोना बाधितांचा आकडा 11 वर