ETV Bharat / state

Indian Students in Ukrain : माझ्या मुलाला परत आणा; युक्रेनच्या युद्धस्थळी अडकलेल्या विद्यार्थ्याच्या आईची आर्त हाक - प्रफुल्ल खराते नागपूर यूक्रेनमध्ये अडकला

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धाचे दुष्परिणाम भविष्यात बघायला मिळतीलच. ( Ukrain Russia War Impact ) मात्र, जे विद्यार्थी या दोन देशांमध्ये शिक्षण घेण्याच्या उद्देशाने गेले आहेत त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. ( Indian Students in Ukrain ) काही नशीबवान विद्यार्थी मायदेशी परत आले असले तरी अजूनही हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांपैकीच एक विद्यार्थी नागपूरचा प्रफुल्ल राजू पराते हा युक्रेनच्या खरचो शहरात अडकला आहे. ( Nagpur Student in Ukrain )

Nagpur Student Stuck in Ukrain
Nagpur Student Stuck in Ukrain
author img

By

Published : Mar 1, 2022, 3:09 PM IST

नागपूर - रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धाचे दुष्परिणाम भविष्यात बघायला मिळतीलच. ( Ukrain Russia War Impact ) मात्र, जे विद्यार्थी या दोन देशांमध्ये शिक्षण घेण्याच्या उद्देशाने गेले आहेत त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. ( Indian Students in Ukrain ) काही नशीबवान विद्यार्थी मायदेशी परत आले असले तरी अजूनही हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांपैकीच एक विद्यार्थी नागपूरचा प्रफुल्ल राजू पराते हा युक्रेनच्या खरचो शहरात अडकला आहे. ( Nagpur Student in Ukrain ) प्रफुल्ल पराते वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तो अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून खरकीव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे.

ईटीव्ही भारत प्रतिनिधीने याबाबत घेतलेला आढावा

युक्रेनमध्ये चारही बाजूने फायरिंग सुरू असल्याने त्याने गेल्या पाच दिवसांपासून बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. मात्र, परिस्थिती चिघळत असल्याने आता जीव वाचवण्यासाठी प्रफुल्ल आणि त्याच्या मित्रांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुढील हंगेरी देशाच्या सीमेपर्यंतचा प्रवास हा सोळाशे किलोमीटर अंतराचा असल्याने तो कसा पूर्ण होईल अशी चिंता प्रफुल्लच्या कुटुंबीयांना लागली आहे. प्रफुल्लची परीक्षा अवघ्या दोन महिन्यांत होणार होती. मात्र, दोन देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे शिक्षण सोडून मायदेशी परत येण्याचा मार्ग धरावा लागला आहे. युद्धाची तीव्रता वाढत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे टेन्शनही वाढत आहे. प्रफुल्ल हा मागच्या वर्षी भारतात आला होता. त्यानंतर तो आलेला नाही.

हेही वाचा - 40-mile Russian convoy: 40 मैलांचा रशियन काफिला; गोळीबार तीव्र करण्याची कीवला धमकी

प्रशासनाकडून मदत नाही -

माझा मुलगा हा युक्रेनमध्ये ज्या भागात युद्ध सुरू आहे त्याठिकाणी अडकलेला आहे. मी माझ्या मुलाला वाचवा, अशी विनवणी करते आहे. शासन, प्रशासन, आमदार, खासदार आणि मंत्र्यांसमोर माझी कैफियत मांडली. मात्र, मला केवळ आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही, असे प्रफुल्लची आई संगीता पराते यांनी सांगितले.

वडील सैन्यात अधिकारी -

प्रफुल्ल पराते विद्यार्थी हा मूळचा वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आहे. मात्र, मुलांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने प्रफुल्लचे वडील राजू कुटुंबासह दोन वर्षांपूर्वी नागपूरला स्थायिक झाले. ते स्वतः सीआरपीएफमध्ये कार्यरत असून कोलकाता येथे निरीक्षक पदावर तैनात आहेत. मुलगा युक्रेनमध्ये युद्धात अडकला असल्याने राजू यांना देशसेवा सोडून नागपूरला परत आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.