नागपूर - आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी भौगोलिक दृष्टिकोनातून सुरक्षितता, आधुनिकता आणि स्वयंपूर्णता या निकषांवर किल्ला कसा निर्माण केला असता. हा विचार समोर ठेऊन नागपूरच्या मॉडर्न प्रायमरी शाळेने एक काल्पनिक मात्र आगळा वेगळा किल्ला निर्माण केला आहे.
हेही वाचा - फटाक्याची दिवाळी तर कोणीही साजरा करतो, पण अशी दिवाळी कधी ऐकलेत का?
ऐतिहासिक शिवकालीन किल्ले निर्माण करण्याऐवजी शाळकरी विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लावली जाते. त्यांच्या मनात महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा अभिमान निर्माण करण्यासाठी गेले अनेक वर्षे मॉडर्न शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी काल्पनिक किल्ले तयार करततात. यावर्षी शाळेने 'प्रपातगड' हा धबधबा असलेला किल्ला निर्माण केला आहे. या काल्पनिक प्रपातगडात शिवकालीन किल्ल्यांचे सर्व बारकावे, भौगोलिक काठिण्य, उंच सखलता असे आकर्षण पाहण्यासारखे होते. त्याशिवाय किल्ल्याभोवती राहणाऱ्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्याचा दृष्टीने दळणवळण, ऊर्जा स्रोत आणि आधुनिक सोयी कशा असाव्यात हेही या काल्पनिक किल्ल्यात पाहायला मिळते.
हेही वाचा - ११ हजार रुपये किलोची मिठाई खरेदीसाठी ठाण्यात झुंबड