नागपूर: जिंदगी कभी भी किसी को दुसरा मौका नही देती, लेकीन मुझे किस्मत से दूसरी जिंदगी मिली है! तो मैं इसे लोगों के लिए समर्पित करता हु, हे वाक्य आहेत. नागपूरच्या संजय गुप्ता यांचे. 18 वर्षांपूर्वी त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. त्यावेळी ते दोन महिने कोमात तर एक महिना व्हेंटिलेटरवर होते. संजय गुप्ता उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यावेळी डॉक्टरांनी हातवर केले होते.
चौकात बॅनर घेऊन उभे राहतात: मात्र चमत्कारिकरित्या त्यांचा पुनर्जन्म झाला. वर्षभर उपचार घेतल्यानंतर त्यांनी एक मोहीम हाती घेतली. गेल्या 17 वर्षांपासून अविरतपणे आजही सुरू आहे. संजय गुप्ता हे नाव नागपूरकरांसाठी फारसं परिचयाचे नसेल ही पण संजय गुप्ता यांनी नागपुरच्या लोकांसाठी एका वसा घेतला आहे. मी जे भोंगलं आहे, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून संजय गुप्ता दिवसातील 3 तास शहरातील एखाद्या चौकात बॅनर घेऊन उभे राहतात. वाहनचालकांनी हेल्मेट घालुनचं वाहन चालवावे. यासाठी ते गेल्या 17 वर्षांपासून अविरतपणे जनजागृती करत आहेत. त्याची ही कहाणी प्रेरणादायी आहे.
एका अपघाताने जीवनचं बदललं: 2004 साली संजय गुप्ता मेडिकल रिप्रेझेनटिव्ग म्हणून काम करत होते. दिवसभर डॉक्टरांच्या भेटीगाठी झाल्यानंतर संध्याकाळी ते घरी जायला निघाले तेव्हा अंधार पडला होता. त्यामुळे संजयने डोक्यावरचे हेल्मेट काढून गाडीला टांगले आणि घरची वाट धरली. घाईगडबडीत ते गाडीचे साईड स्टँड काढायला विसरले. एका वळण मार्गावर स्टँड रस्त्याला लागल्यामुळे त्यांचा भीषण अपघात झाला. ज्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. रस्त्याच्यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात ते निपचित पडले असताना कुणीही त्यांची पुढे येऊन मदत केली नाही. त्यामुळे ते मृत्यूच्या दाढेत उभे झाले होते.
माझा दुसरा जन्मचं झाला: अनेक तासानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र शरीर उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी देखील हातवर केले होते. तब्बल 2 महिने कोमा आणि 1 महिना व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर त्यांचा दुसरा जन्माचं झाला. सुमारे वर्षभर खाटेवर राहिल्यानंतर पुन्हा नव्याने जीवन जगायला सुरुवात झाली. त्यावेळी एक लक्षात आलं की 'जिंदगी कभी भी किसी को दुसरा मौका नही देती, लेकीन मुझे किस्मत से दूसरी जिंदगी मिली है' त्यामुळे हे जीवन आता लोकांच्या मदतीसाठी खर्च करावे, म्हणून दिवसातील 3 तास वाहनचालकांची जनजागृती करत असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
सुरुवातीला लोकांनी हिणवले: वर्षभर उपचार झाल्यानंतर संजय गुप्ता यांना धड चालता देखील येत नव्हते. या परिस्थितीत ते हातात बॅनर घेऊन रस्त्यावर उभे राहायचे. त्यावेळी येणारे जाणारे लोक त्यांना वेड्यात काढत होते. परिचित लोकं तर मला मुर्ख म्हणून देखील हिणवले. तरीदेखील त्यांनी वाहन चालकांची जनजागृती करण्याचा उपक्रम सोडला नाही. 17 वर्षाच्या काळात अनेक लोक मला भेटताच ज्यांनी अपघातात आपले स्नेही गमावले आहेत.