नागपूर - सलग दुसऱ्या दिवशी नागपुरात ६० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली आहे. मात्र नागरिकांमध्ये बेफिकिरी किंचितही कमी झाल्याचे दिसत नाही. गेल्या २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ४ हजार १०८ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४० हजार ८०७ इतकी झाली आहे. उपराजधानी नागपूरमध्ये उपचारादरम्यान होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या राज्यातील इतर महानगरांपेक्षा खूप जास्त आहे.
चिंताजनक! सलग दुसऱ्या दिवशी नागपुरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूचा आकडा वाढला - nagpur corona news
गेल्या २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ४ हजार १०८ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे.