नागपूर : Nagpur Rain Update : नागपुरात नाग नदीला आलेल्या महापुरामुळं सुमारे दहा हजार घरांचं नुकसान झालंय. घरात पाणी शिरल्यामुळं घरगुती साहित्य तसंच अन्नधान्य भिजलं आहे. तसेच घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल, तसंच नुकसानी संदर्भात पंचनाम्याला सुरुवात करुन तत्काळ मदत देण्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
नुकसान भरपाईचे आदेश : शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चार तासात जोरदार पावसामुळं अंबाझरी परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यामुळं अन्नधान्यासह इतर साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी केली. डागा लेआउट, कार्पोरेशन कॉलनी, शंकर नगरसह इतर वस्त्यांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. तसंच घरात चिखलामुळं झालेल्या नुकसानीचीही त्यांनी पाहणी केली. या पुरात सुमारे दहा हजार घरांचं नुकसान झालं असून, या नुकसानी संदर्भात नागरिकांना संपूर्ण मदत करण्यात येईल ,अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिलीय. नुकसानी संदर्भात नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावर जास्तीत जास्त मदत करण्याची ग्वाही यावेळी फडणवीसांनी दिलीय.
भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी उपाययोजना : अवघ्या ४ तासात 109 मिलिमीटर एवढा पाऊस झाल्यानं पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी नदीचं पात्र कमी पडल्यामुळं इतर वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. यापुढं अशी घटना घडणार नाही याची दखल घेण्यात आली असून पाण्याचा प्रवाह कुठंही थांबणार नाही. यादृष्टीनं आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येईल. भविष्यात अशा घटना टाळण्यास येतील असंही फडणवीसांनी सांगितलंय. पुराचं पाणी घरात शिरल्यामुळं सर्वत्र चिखल साचलाय. घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येतंय. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.
हेही वाचा :