ETV Bharat / state

Nagpur Murder Case : नागपूर हादरलं; १२ तासात दोन हत्या, पती पत्नीच्या नात्यातील संशय ठरला कारणीभूत - कन्हान पोलीस ठाणे

Nagpur Murder Case : गेल्या 12 तासात नागपूर शहरात दोन हत्येच्या घटना (Nagpur Crime News) घडल्यात. पहिली घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या (Imamwada Police Station) हद्दीतील जाटतरोडी भागात घडली आहे. तर दुसरी घटना कन्हान पोलीस ठाणे (kanhan police station) हद्दीत घडली आहे. या हत्यांच्या घटनांमुळं नागपूर हादरलं आहे.

Nagpur Murder Case
१२ तासात दोन हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 7:50 PM IST

प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक प्रभाकर गड्डीने

नागपूर Nagpur Murder Case : गेल्या १२ तासात नागपूर शहरात दोन हत्येच्या घटना घडल्या (Nagpur Crime News) आहेत. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाटतरोडी भागात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तर दुसरी घटना ही कन्हान पोलीस ठाणे (kanhan police station) हद्दीत घडली. यामध्ये संशयावरुन नवऱ्याने पत्नीची हत्या केली. दोनही हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हत्येची पहिली घटना : ही इमामवाडा पोलीस (Imamwada Police Station) ठाण्याच्या हद्दीतील जाटतरोडी भागात घडली आहे. या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर उर्वरित दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे अनैतिक संबंध असल्याचा तिच्या पतीला संशय होता. ज्यांच्याबरोबर तिचे संबंध असल्याचा संशय होता. त्यांनीच तिच्या पतीचा हत्या केली. याप्रकरणी फिर्यादी महिला पतीसोबत असतानाच तिच्या पतीची पहाटे हत्या केली. यावेळी आरोपी दोन मित्रांसह आला होता. त्यांनी संगनमत करून फिर्यादीच्या पतीला धारदार शस्त्राने लाकडी दांड्याने व विटाने मारहाण करून गंभीर जखमी केलं. यावेळी त्याला उपचाराकरता मेडिकल हॉस्पीटल येथे नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. याप्रकरणी फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे इमामवाडा येथे आरोपींविरुद्ध कलम ३०२ सह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली आहे.

पतीने केली पत्नीची हत्या : हत्येची दुसरी घटना कन्हान पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. कौटुंबिक कारणावरून आरोपी पतीने पत्नीची हत्या केली आहे. दुलेश्वरी भोयर असे मृतक पत्नीचं नाव आहे तर अमित भोयर असं आरोपी पतीचं नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी हा स्वतःचं पोलिसांना शरण गेला आहे. आरोपीने स्वतः पत्नीची हत्या केल्याची बाब पोलिसांना सांगितली. धक्कादायक म्हणजे आरोपी आणि मृतक महिलेच्या लग्नाला अवघं दीड वर्ष पूर्ण झालं होतं. त्यांना दहा महिन्यांची मुलगी देखील आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्येमागील कारणांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा -

  1. Thane Murder News: सासूने घरात येण्यास मज्जाव केल्यानं पतीकडून पत्नीची हत्या, सासूवर हातोडीनं हल्ला
  2. Nagpur Murder Case : संपत्तीच्या वादातून नवऱ्याने केली दुसऱ्या पत्नीची हत्या, आरोपीला अटक
  3. Nanded Murder News: 'पहिली मुलगी का झाली?' म्हणत जवानाने केली गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.