ETV Bharat / state

नियमांचे उल्लंघन आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर नागपूर मनपा आयुक्तांची दंडात्मक कारवाई - नागपूर रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई बातमी

नागपुरातील अनेक गर्दीच्या ठिकाणी व्यावसायिकांनी अगदी रोडवर अतिक्रमण केल्याने ही समस्या आणखीच वाढत आहे. कोरोना संकटाच्या काळात रस्त्यावर गर्दी होणे ही अत्यंत धोकादायक बाब लक्षात येताच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गांधीबाग झोन अंतर्गत भागाचा आकस्मिक दौरा केला. या दौऱ्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर ५ ते १० दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नागपूर मनपाची कारवाई
नागपूर मनपाची कारवाई
author img

By

Published : Jul 28, 2020, 10:29 PM IST

मूर्तीकारांवरही
मूर्तीकारांवरही ठोठावला दंड

नागपूर : शहरातील सी.ए.रोड, गोळीबार चौक, मस्कासाथ, इतवारी, मच्छीबाजारसह अनेक भागांचा नागपुर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दौरा केला. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे बघायला मिळाले. आयुक्त मुंढे यांनी फुटपाथवर सामान ठेवणारे दुकान, दुकानातील गर्दी अशा सर्वांसह चितारओळीतील मूर्तीकारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात केली आहे.

नागपूर शहरात वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणी व्यावसायिकांनी अगदी रोडवर अतिक्रमण केल्याने ही समस्या आणखीच वाढत आहे. कोरोना संकटाच्या काळात रस्त्यावर गर्दी होणे ही अत्यंत धोकादायक बाब लक्षात येताच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गांधीबाग झोन अंतर्गत भागाचा आकस्मिक दौरा केला. या दौऱ्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर ५ ते १० दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याआधी आयुक्तांनी सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील फुटपाथवर सामान ठेवणाऱ्या दुकानांचा चांगलाच समाचार घेतला व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक दुकानदाराकडून १० हजारांचा दंड वसूल केला. त्यानंतर गोळीबार चौकातील जागन्नाथ बुधवारी भागात अनेक किराणा दुकानांमध्येही तिच स्थिती दिसून आली. त्यांच्यावरही १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पुढे मस्कासाथ बंगाली पंजा, इतवारी भागात काही किराणा दुकानांनी फुटपाथवर अतिक्रमण करून सामान ठेवले होते. तर काहींनी फुटपाथवरच दुकान मांडले होते. अशा दुकानदारांनाही यापुढे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यास सामान जप्त करण्याचा इशारा देत त्यांच्याकडून पाच व १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याचबरोबर फुटपाथवरील लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढे चितारओळीत मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्त्या रस्त्यावर ठेवल्याचे दिसून आले. या ठिकाणी आयुक्तांनी मूर्तीकारांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन केले. रस्त्यावर मूर्ती ठेवल्याने अतिक्रमणाच्या कारवाई अंतर्गत सर्व मूर्तीकारांकडूनही दंड वसूल करण्यात आला.

शहरात नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करीत सद्या ५ व १० हजार रुपये दंड वसूल करण्यात येतो. शहरातील नागरिकांसह दुकाने, आस्थापनांना शिस्त लागावी. नियमांचे पालन व्हावे व रस्ते, फुटपाथ मोकळे राहावेत या उद्देशाने ही कारवाई केली जाते. मात्र दंड भरूनही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करणे सोडत नाही. यापुढे नागरिकांकडून नियमांचे पालन न झाल्यास पुढे २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल, असा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.