ETV Bharat / state

Nagpur Metro Ticket Prices : नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे तिकीटांच्या दरात वाढ; 'हे' असतील नवीन दर - increase in passenger numbers

नागपूरात मेट्रोच्या प्परव संख्येत दिवसेंदिवस होणाऱ्या वाढमुळे रेल्वे प्रशासनाकडून तिकीट दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता 15 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी 20 ऐवजी 35 रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. नागपूरकरांचा मेट्रोला चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून दिवसभरात एक लाखांपेक्षा अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत.

Nagpur Metro
नागपूर मेट्रोच्या तिकीटात वाढ
author img

By

Published : Jan 18, 2023, 4:28 PM IST

नागपूर : नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात वाढ झाली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात महामेट्रोकडून तिकीट दरांमध्ये मोठी सवलत दिलेली होती. मात्र, आता सवलत बंद करण्यात आल्यामुळे तिकिटांचे दर पूर्ववत झाले आहेत. दरम्यानच्या, काळात मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवासांच्या संख्येत मोठी घट झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महामेट्रो कडून सवलतीच्या दरात तिकिटांची विक्री सुरू करण्यात आली होती. आता 15 किलोमीटर पेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी 20 ऐवजी 35 रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे.

मेट्रोला मोठ्या प्रमाणात पसंती : इंधन दरवाढीची झळ सर्वांनाचं बसल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजेच आपली बसचे तिकीट वाढले असल्याने नागपूरकरांनी मेट्रोच्या प्रवासाला सुरुवात केली होती. केवळ 5 आणि 10 रुपयांमध्ये वातानुकूलित प्रवास होत असल्याने प्रवाशांनी मेट्रोच्या प्रवासाला भरभरून प्रतिसाद दिला. दिवसभरात एक लाखांपेक्षा अधिक प्रवासी रोज प्रवास करत आहेत. सवलतीच्या दरात प्रवास आणि वेळेची बचत म्हणून देखील मेट्रो नागपूरकरांच्या पसंतीला उतरली आहे.

नागपूर मेट्रोचे नवीन तिकीट दर : नागपूर मेट्रोने सवलतीच्या दरात तिकीट सेवा सुरू केल्यानंतर कमीत कमी पाच रुपये आणि जास्तीत जास्त दहा रुपये तिकीट दर आकारले जात होते. मात्र, आता तिकीटदरांची सवलत काढल्यानंतर १ ते सहा किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी सहा रुपयांचे तिकीट काढावे लागेल. तर ६ ते ९ किलोमीटर अंतरासाठी दहा रुपयांचे तिकीट लागेल. ९ ते १२ किलोमीटर प्रवासासाठी १५ आणि १२ ते १५ किलोमीटर अंतराच्या प्रवासाला २० रुपयांचे तिकीट लागणार आहे. १५ पेक्षा अधिक किलोमीटर अंतरासाठी सर्वाधिक ३५ रुपये खर्च करावे लागणार आहेत. दरम्यान, खापरी ते ऑटोमोटिव्ह स्टेशन पर्यत ३५ रुपये खर्च येईल पूर्वी एवढ्याचं प्रवासासाठी केवळ २० रुपये खर्च येत होता.

रायडरशिपने २ लाखांचा टप्पा पार : २०२२ मध्ये रायडरशिपचे नवीन उच्चांक गाठल्यावर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर मेट्रोने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. आज (१ जानेवारी २०२३ - रविवारी) महामेट्रोची रायडरशिप 2 लाख 02 हजार 608 इतकी होती. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-1 पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांनंतर महा मेट्रोने हा महत्वाचा टप्पा गाठला. नागपूर मेट्रोने हा आकडा मेट्रो गाडीच्या डब्यातील तसेच स्टेशन वरील गर्दी या वाढलेल्या रायडरशीपचे प्रमाण आहे.

प्रवासी संख्येत वाढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच सुरू झालेल्या दोन मार्गिकांवर प्रवाशांची गर्दी अनुभवायला मिळत आहे. किंबहुना, गेल्या काही काळापासूनचा ट्रेंड पाहता महामेट्रोच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे आणि या बाबींचा विचार करून आणि या प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा अंदाज घेऊन महा मेट्रोने सर्व स्तरांवर आवश्यक कर्मचारी तैनात केले होते.

शहराच्या चहु बाजूने मेट्रोसेवा : मेट्रोच्या कामठी मार्ग तसेच सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर मेट्रो सुरू होण्याची नागरिक प्रतिक्षा करीत होते. नागपूर मेट्रो आता शहराच्या चारही बाजूने सुरु झाली आहे. यामध्ये कॉलेज व शाळेत जाणारे विद्यार्थी, नौकरीदार तसे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मेट्रोने प्रवास करतात. दरम्यान, सकाळी ६ वाजता पासून ते रात्री १० वाजतापर्यंत दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा नागरिकांकरिता उपलब्ध आहे.

हेही वाचा : Mumbai Metro Rail : पश्चिम उपनगरातील प्रवाशांना दिलासा ; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार मेट्रोच्या नव्या मार्गिकांचे लोकार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.