ETV Bharat / state

..अखेर 'एमबीए' प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया रखडली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच, विद्यापीठ प्रशासनाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या एमबीए अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे.

नागपूर विद्यापीठ
नागपूर विद्यापीठ
author img

By

Published : Dec 12, 2020, 4:10 PM IST

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या एमबीए अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया रखडली होती. त्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच, विद्यापीठ प्रशासनाकडून निर्णय घेत प्रवेश प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी कक्षाद्वारे प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून 14 डिसेंबरपर्यत प्रवेशासाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे एमबीए करू पाहणाऱ्या विद्यार्थांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

कोरोनामुळे राज्यातील जवळजवळ सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या होत्या. त्यानंतर हळूहळू आता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. नागपूर विद्यापीठाकडूनदेखील एमबीए प्रवेशाला सुरुवात झाली आहे. त्याकरिता अर्ज नोंदणीच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल 23 जूनला जाहीर करण्यात आला. मात्र, कोरोनामुळे पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने एमबीएच्या प्रवेशालाही विलंब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच रखडली होती.

पात्र विद्यार्थ्यांची संख्या -

प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून पात्र विद्यार्थांची संख्या मोठी आहे. एमबीएसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 10 हजार इतकी आहे. शिवाय, एमबीएसाठी सद्यस्थितीत जागा फक्त 34 हजार 300 च्या घरात आहेत.

प्रवेशाकरीता धडपड व संताप -

प्रवेशासाठी विद्यार्थांमध्ये मोठी धडपड पाहायला मिळत आहे. अशातच ठराविक जागा असल्याने आणि प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्याने विद्यार्थी संताप देखील व्यक्त करत आहेत. उशिरा का होईना, पात्र विद्यार्थांना एमबीए प्रवेशाकरिता अर्ज दाखल करता येणार आहे. तर दुसरीकडे ठराविक जागेतील 1 हजार जागा खुल्या व महाराष्ट्राबाहेरील प्रवर्गासाठी असणार आहेत. त्यामुळे स्पर्धा कठीण असल्याचे पाहायला मिळत आहे.

अर्ज शुल्क - प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क 5 हजार रूपये इतके असणार आहे. अशावेळी आर्थिक बाबींचादेखील विद्यार्थांना विचार करावा लागणार आहे.

वेळापत्रक -

  • 8 ते 14 डिसेंबर - अर्ज नोंदणी
  • 16 डिसेंबर - तात्पुरती गुणवत्ता यादी
  • 20 डिसेंबर -अंतिम गुणवत्ता यादी
  • 21 ते 23 डिसेंबर - प्रथम फेरी
  • 26 डिसेंबर - विद्यार्थांना प्रवेशाचे अलॉटमेंट
  • 27 ते 29 डिसेंबर - प्रवेश स्वीकृती व प्रवेश नोंदवणे
  • 31 डिसेंबर ते 1 जानेवारी - दुसऱ्या फेरीसाठी पर्याय नोंदवणे
  • 4 ते 7 जानेवारी - दुसऱ्या फेरीचे अलॉटमेंट व प्रवेश
  • 8 ते 12 जानेवारी - रिक्त जागांची माहीती देणे
  • 14 जानेवारी - प्रवेशाची अंतिम तारीख
  • 15 जानेवारी - ऑनलाईन प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख

अशा पद्धतीने एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा - मानलेल्या बहिणीशी बोलल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणाचा गुंडाकडून खून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.