ETV Bharat / state

होळीच्या तोंडावर राज्य उत्पादक शुल्क विभाग सक्रिय, अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई - राज्य उत्पादक शुल्क विभाग नागपूर

होळीमध्ये मद्यविक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. हीच संधी साधत शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जाते. तसेच राज्य उत्पादन विभागाला याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे होळीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

nagpur excise department
होळीच्या तोंडावर राज्य उत्पादक शुल्क विभाग सक्रीय
author img

By

Published : Mar 5, 2020, 12:38 PM IST

नागपूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर पथकाने शहरातील कळमना यशोधरा या परिसरासह केळवद येथील अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी शेकडो लिटर दारू जप्त करण्यात आली. होळीच्या पार्श्वभूमीवर हे कारवाई करण्यात आली. यावेळी ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

होळीच्या तोंडावर राज्य उत्पादक शुल्क विभाग सक्रीय, अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

होळीमध्ये मद्यविक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. हीच संधी साधत शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जाते. तसेच राज्य उत्पादन विभागाला याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार गेल्या आठवड्यात भिवसेनखोरी येथे दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आता ऐन होळीच्या तोंडावर केळवद, शहरातील कळमना आणि यशोधरा भागात छापा टाकण्यात आला. यामध्ये 200 लिटर क्षमतेचे प्लास्टिकचे 70 ड्रम आणि 15 लोखंडी बॅरल, 15 हजार लिटर सडव्यासोबत 6 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दहा आरोपींना अटक करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.