ETV Bharat / state

चीनी वस्तूंनी सजली नागपुरातील बाजार पेठे; भारतीय वस्तू महाग असल्याने मागणी कमी - नागपूर इलेक्ट्रॉनिक्स मार्केट न्यूज

भारत आणि चीन संबंध ताणलेले आहेत. या पार्श्वभूमीवर चीनी अ‌ॅप आणि वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, नागपूरच्या बाजारपेठेतील परिस्थिती पाहता चित्र उलट असल्याचे दिसते.

Chinese lights
चीनी दिवे
author img

By

Published : Nov 8, 2020, 3:19 PM IST

नागपूर - प्रकाशाचा सण असलेला दिवाळी सण भारतीय मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मात्र, दरवर्षी असणारा उत्साह कोरोनामुळे यावर्षी अद्याप दिसलेला नाही. बाजारामध्ये खरेदीसाठी नागरिकांची म्हणावी अशी गर्दी अद्याप दिसत नाही. इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसह सजावटींच्या वस्तूंचे बाजार मात्र, चीनी वस्तूंनी सजले आहेत. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे किमान यावर्षी तरी 'वोकल फॉर लोकल'ला प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बाजारातील परिस्थिती वेगळेच सत्य मांडताना दिसत आहे.

नागपुरातील शनी मंदिर बाजाराचा ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा

चीनी वस्तू विकल्याशिवाय पर्याय नाही -

नागपुरातील इलेक्ट्रॉनिक बाजार संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. शनी मंदिर बाजार म्हणून हे मार्केट प्रसिद्ध आहे. याठिकाणी सर्व प्रकारच्या सजावटीच्या वस्तू वाजवी दरात मिळतात. कोरोना काळानंतर ही बाजारपेठ हळूहळू गती घेत आहे. दिवाळीत चांगला व्यवसाय होईल आणि गेल्या आठ महिन्यात झालेले नुकसान भरून निघेल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे. मात्र, त्यासाठी चीनी वस्तू विकल्याशिवाय पर्याय नसल्याचे व्यापारी सांगतात. चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर केंद्र सरकारने निर्बंध लावल्यास भारतीय बनावटीच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यापारी आणि ग्राहकांनी व्यक्त केले आहे.

भारतीय बनावटीच्या वस्तू महाग -

भारतीय बनावटीच्या वस्तू महाग असल्याने ग्राहक त्या वस्तूंना प्राधान्य देत नाहीत. चीनी लायटिंग सिरीज शंभर रुपयांना मिळते उलट, तीच भारतीय बनावटीची लायटिंग दीडशे ते दोनशे रुपयांना मिळते. म्हणूनच चिनी वस्तूंची मागणी वाढते.

'कॅट' देणार होता चीनला धक्का -

नियंत्रण रेषेवर चीनच्या कुरापती सुरूच असल्याने यावर्षी दिवाळीत कॉन्फड्रेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (भारतीय व्यापारी महासंघ) चिनी वस्तू खरेदी करणार नसल्याचे ठरले होते. या माध्यमातून चीनला ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल, असा दावा देखील करण्यात होता. मात्र, सध्याची परिस्थिती बघता हा दावा फोल ठरत असल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.