ETV Bharat / state

Nagpur drown death: पोहण्याचा मोह आला अंगलट, मोहगाव झिल्पी तलावात बुडून ५ तरुणाचा मृत्यू - झिल्पी तलाव ५ तरुण मृत्यू

रविवारच्या सुट्टी असल्याने नागपुरातील काही तरुण हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी येथील तलाव येथे फिरायला गेले होते. यावेळी अनेकांना तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. पाच तरुण पोहत असताना खोल पाण्यात गेल्यानंतर पाचही तरुणांचा बुडाल्याने मृत्यू झाला आहे.

Nagpur drown death
5 friends drown to death in zilpi lake
author img

By

Published : Jul 3, 2023, 10:37 AM IST

नागपूर- रात्री उशिरापर्यंत झिल्पी तलावातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. मृतकांमध्ये ऋषिकेश पराळे,राहुल मेश्राम,वैभव भागेश्वर वैद्य, शंतनू आरमरकर यांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार काल ऋषिकेश पराळे हा तीन मित्रांसोबत मौजमजा करायला मोहंगाव येथे गेले होते. त्यांनी आणखी तिघांना मोहगाव झिलपी येथे बोलावून घेतले. सर्व जण मजा करत असताना पाच तरुण पोहण्यासाठी गेले. तर त्यापैकी एक तरुण हा कार जवळ उभा होता. सुरुवातीला तलावाच्या काठावर पोहत असताना पाचही तरुण उत्साहाच्या भरात पुढे पुढे जात होते. ते इतके पुढे निघून गेले की त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाजच आला नाही. अचानक सर्व तरुण गटांगळ्या खाऊ लागल्यानंतर एकाने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र,त्याचा काही उपयोग झाला नाही. बघता-बघता पाचही तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

आरडाओरडा केली, पण कुणी आलं नाही- सुरुवातीला तीन मित्र खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. पुन्हा काठावर असलेले दोघेजण त्यांच्या मदतीला गेले ते सुद्धा बुडाले. त्यामुळे
डॉक्टर प्राजक्त घाबरले होते. त्यांनी मदतीसाठी खूप आरडाओरडा केला. पण कुणीही मदतीला पुढे आले नाही. याबाबत लगेच शहर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर हिंगणा ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे स्टाफ घटनास्थळी दाखल झाले होते.

नकार दिल्याने वाचले डॉ प्राजक्त- ऋषिकेश पराळे हा डॉक्टर प्राजक्त मोरेश्वर लेंडे यांच्या कारवर चालक म्हणून काम करत होता. ऋषिकेशने त्यांना फोन करून मोहगाव झिलपी येथे येण्यास आग्रह केला होता. प्राजक्त दोन मित्रांना सोबत घेऊन तलावावर गेले होते. ऋषिकेशने सर्वांना पोहण्याचा आग्रह धरला. पण डॉक्टर प्राजक्त यांनी नकार दिला. मात्र, त्यांच्यासोबत आलेले दोन मित्र तलावात गेले. त्या सर्वांचा मोहंगाव झिलपी तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढले-पोलिसांनी तात्काळ मृतदेह शोध मोहीम सुरू केली. रात्री उशिरा सर्व पाचही मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. या आधी देखील मोहगाव झिल्पी या तलावात अनेकांचा मृत्यू झालेला आहे. रविवारची सुट्टी किंवा इतर सुट्टीच्या वेळी या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे परिसरात धोक्याची सूचना देणारे अनेक फलक लावण्यात आले आहे. तरी देखील उत्साहाच्या भरात तरुणांना पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी देखील मागणी स्थानिकांनी केली आहे.

हेही वाचा-

  1. Juhu Beach Accident: जुहू बीचवर 6 जण बुडाले; दोघांची सुटका, अजूनही दोघे बेपत्ता
  2. Four drown in farm lake : शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू; पोहण्यासाठी गेले असता घडली घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.