ETV Bharat / state

दिलासादायक! जून महिन्याच्या पहिला दिवस बाधितांची संख्या 203 वर - Nagpur corona news

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी आलेल्या अहवालात 10 हजार 545 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 203 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

नागपूर कोरोना न्यूज
दिलासादायक! जून महिन्याच्या पहिला दिवस बाधितांची संख्या 203 वर
author img

By

Published : Jun 1, 2021, 6:45 PM IST

नागपूर - एप्रिल महिन्यात दररोज उच्चांक गाठला असताना दुसरी लाट ओसरतांना 203 नवे बाधित मिळून आले. यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी रुग्णसंख्या दोनशेच्या घरात आल्याने दिलासा मिळाला आहे. यात विशेष म्हणजे रिकव्हरी रेट हा 96.94 इतका आल्याने भीतीचे सावट कमी होत चालले आहे.

मागील 24 तासातील आढावा
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी आलेल्या अहवालात 10 हजार 545 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 203 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये शहरी भागात 142 तर ग्रामीण भागातील केवळ 57 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच 12 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. यामध्ये शहरी भागात 6, ग्रामीण भागात 2 तर जिल्हाबाहेरील 4 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. तेच 833 जणांपैकी शहरात 457 तर ग्रामीण 376 जण कोरोनामुक्त झाले आहे. यात 1920 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 3 हजार 699 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहे.

आतापर्यंतची परिस्थिती
दुसऱ्या लाटेत मे महिन्यात 1 लाख 28 हजार 038 जणांनी एका महिन्यात कोरोनावर मात केली आहे. यात सक्रिय रुग्णसंख्येत घटून 6 हजार 261 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 74 हजार 808 जण रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यातून 4 लाख 60 हजार 275 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. यात मृत्यूचा आकडा हा 8914 वर जाऊन पोहचली आहे. 2581 रुग्ण मे महिन्यात दगावले आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेंट हा 96.94 वर जाऊन पोहचला आहे.

सहा जिल्ह्यात बधितांची संख्या 627 घरात, 27 जणांचा मृत्यू
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 1 हजार 887 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 627 जण नव्याने कोरोनाबाधित मिळून आले आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील 27 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. यात बाधितांच्या तुलेनेत 1 हजार 260 अधिकचे रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे. यात नागपूरचा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 2.9 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 3.34 वर आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.