ETV Bharat / state

धावत्या रेल्वेमध्ये 9 वर्षीय चिमुकलीवर कोच अटेंडंटचा अत्याचाराचा प्रयत्न; संतापलेल्या प्रवाशांनी केली धुलाई - आरपीएफ

Nagpur Crime News : बंगळुरु-पाटणा पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये कोच अटेंडंटनं 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. ही घटना मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त झालेल्या प्रवाशांनी कोच अटेंडंटची धुलाई केलीय.

Nagpur Crime News
Nagpur Crime News
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 10:01 AM IST

नागपूर Nagpur Crime News : धावत्या ट्रेनमध्ये कोच अटेंडंटनं एका 9 वर्षीय चिमुकलीवर ट्रेनच्या वॉशरुममध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना बंगळुरु-पाटणा पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये घडलीय. या घटनेनंतर संतापलेल्या प्रवाशांनी आरोपी कोच अटेंडंटची जोरदार धुलाई केली. मोहम्मद मुन्ना असं नराधम आरोपीचं नाव आहे. प्रवाशांनी आरोपीला आरपीएफच्या स्वाधीन केल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक करत पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय.

बाथरुमचा दरवाजा तोडून कोच अटेंडंटकडून अश्लिल चाळे : बंगळुरु येथून पाटलीपुत्र एक्सप्रेस पाटणाच्या दिशेनं निघाली होती. ही ट्रेन बुट्टबोरी रेल्वे स्टेशन जवळ असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एसी कोचमधून प्रवास करत असलेली 9 वर्षीय चिमुकली बाथरुमला जाण्यासाठी कोचचे दार उघडून बाहेर आली. त्यावेळी कोचचा अटेंडंट मोहम्मद मुन्ना कोचच्या बाहेर बसलेला होता. मुलगी एकटी असल्याचं बघून त्याच्या मनातील सैतान जागा झाला. अल्पवयीन मुलगी बाथरुममध्ये गेल्यानंतर आरोपीनं दाराला धक्का देऊन बाथरुममध्ये प्रवेश केला. अचानक घडलेल्या या घटनेनं मुलगी घाबरुन गेली होती. आरोपीनं याचा गैरफायदा घेत मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यामुळं ती आणखीच भेदरल्यानं तिनं आरडाओरडा सुरू केला. मुलीनं कशीबशी दाराची कडी उघडत बाहेर पळ काढला. त्यानंतर मुलीनं आरडाओरडा करत रडायला सुरुवात केली.

प्रवाशांची उडाली झोप : मुलीच्या जोरात ओरडण्यानं व रडण्यानं कोचमध्ये प्रवास करत असलेले प्रवासी जागे झाले. त्यांना जेव्हा ही घटना समजली. तेव्हा चिडलेल्या प्रवाशांनी आरोपी मोहम्मद मुन्नाची बेदम धुलाई केली. घटनेच्या काही वेळानंतर ही ट्रेन नागपूर रेल्वे स्थानकात दाखल झाली. त्याठिकाणी प्रवाशांनी आरोपीला आरपीएफच्या स्वाधीन केलं. आरोपी मुन्नाला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आलीय. या घटनेमुळं रेल्वेतील महिला सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime : धावत्या रेल्वेतून ढकलल्याने एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी पती-पत्नीला अटक
  2. Centrail Railway News: सावधान! रेल्वेत तिकीट तपासनीसाबरोबर वाद घातल्यास भोगावा लागेल तुरुंगवास,कारण...
  3. Video धावत्या रेल्वेसह महिला जात होती फरफटत, आरपीएफच्या जवानाने मुलासह तिचे वाचविले प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.