ETV Bharat / state

नागपूर गुन्हे शाखेने घातपाताचा कट उधळला, सात जिवंत काडतुसे, तीन पिस्तुलांसह दोघांना अटक

author img

By

Published : Jul 14, 2020, 7:39 PM IST

गुन्हे शाखेच्या पथकाने गिट्टीखदान परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी दोन्ही आरोपी त्या परिसरात संशयास्पदरित्या वावरताना आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी करून झडती घेतल्यावर त्यांच्याजवळ ३ पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे आढळून आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मोठया घातपाताची घटना टळली आहे

nagpur crime news  nagpur crime branch news  nagpur latest news  नागपूर क्राईम न्यूज  नागपूर लेटेस्ट न्यूज  नागपूर गुन्हे शाखा बातमी
नागपूर गुन्हे शाखेने घातपाताचा कट उधळला, सात जिवंत काडतुस, तीन पिस्तुलांसह दोघांना अटक

नागपूर - शहर गुन्हे शाखा पोलिसांनी तीन पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसांसह दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे घातपाताची मोठी घटना टळली आहे. शशंका समुद्रे आणि ऋषभ शाहू, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

नागपूर गुन्हे शाखेचे एक पथक चेनस्नॅचिंग करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून दोन तरुण कमरेला पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने गिट्टीखदान परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी दोन्ही आरोपी त्या परिसरात संशयास्पदरित्या वावरताना आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी करून झडती घेतल्यावर त्यांच्याजवळ ३ पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे आढळून आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मोठया घातपाताची घटना टळली आहे. आरोपी शशांक आणि ऋषभ यांनी तीन पिस्तुल कुठून मिळवले आणि त्यामागचा उद्देश काय आहे? याचा शोध पोलिसांनी सुरू केला असून आरोपींवर आधीचे काही गुन्हे आहेत का? याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात आणखी काही गुन्हेगारांना अटक होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.