नागपूर- नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहराला स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याकडून नव-नवे प्रयोग केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर महापौरांकडून महापालिकेत 'ब्रेकफास्ट विथ मेयर' हा कार्यक्रम राबविण्यात आला. यात शहरातील नागरिकांना आपल्या समस्या महापौरांसमोर मांडण्याची संधी मिळाली आहे.
या कार्यक्रमात जनतने थेट महापौरांशी चर्चा केली. शहरातील रस्ते, फूटपाथ पार्कींग, पाणी समस्या, खड्डे, मोकाट कुत्र्यांमुळे होणारा त्रास आणि कचरा संकलनाबाबतच्या समस्या मांडण्यात आल्या. या सर्व समस्या जाणून घेतल्यावर येणाऱ्या दिवसात महानगरपालिकेतर्फे समस्यांचे निराकरण करू, असे आश्वासन संदीप जोशी यांनी दिले. अशा अनोख्या प्रयोगामुळे शहरातील समस्या लवकर सुटतील, अशी अपेक्षा उपस्थित लोकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- नागपूर मेट्रो आता ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने धावणार