ETV Bharat / state

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत पालिका निवडणुका होऊ देणार नाही; भाजपा ओबीसी मोर्चाचा इशारा

17 महानगर पालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन ही कारवाई सुरू असल्याने भाजपाीकडून या निवडणूक होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. येत्या तीन तारखेला याचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याची महिती भाजपाच्या मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

नागपुरात भाजपाचा इशारा
नागपुरात भाजपाचा इशारा
author img

By

Published : Sep 3, 2021, 7:10 AM IST

नागपूर - निवडणूक आयोगाकडून महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. यामध्ये ओबीसी आरक्षण वगळून ही प्रक्रिया राबवली जात आहे. यात 17 महानगर पालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन ही कारवाई सुरू असल्याने भाजपकडून या निवडणूक होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. येत्या तीन तारखेला याचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याची महिती भाजपाच्या मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत पालिका निवडणुका होऊ देणार नाही

या पत्रकारपरिषदेला भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष रमेश चोपडे, मनपाचे सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे, धर्मपाल मेश्राम, सतीश भेंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक आयोगाकडून होऊ घातलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने वार्डनिहाय निवडणुका होणार आहे. यामुळे या निवडणुकीसाठी वार्डनिहाय यादी यासोबत इतर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात 52 टक्के जनता ओबीसी आहे. असे असताना त्यांना न्याय मिळणार नसेल तर मग या निवडणुकाचा ओबीसींना काय फायदा होणार आहे. यामुळे ओबीसी अरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नये. यात गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करणार आहे. यासोबत कोर्टात या प्रक्रियेला थांबवण्यासाठी काम करू, असेही ते म्हणालेत.

राज्यात निवडणूका व्हावे यासाठी राज्य सरकारने तात्काळ इंपेरिकल डेटा तयार करावा आणि तो सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष रमेश चोपडे यांनी केली आहे. महानगर पालिकेच्या निवडणुका होऊ नये यासाठी नागपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा निवडणुकीत सर्व विभागाचे मंडळ अध्यक्ष हे आंदोलन करतील. त्यानंतरही सरकार ऐकणार नसेल तर आंदोलन करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.