ETV Bharat / state

Nagpur Crime News : हत्याकांडातील आरोपीचं तरुणांना नासात नोकरीचं आमिष; १११ तरुणांना घातला साडेपाच कोटींचा गंडा - अपॉइंटमेन्ट लेटर

एका खुनातील मुख्य आरोपीने नासामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन 111 लोकांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. ओमकार महेंद्र तलमले असे आरोपीचे नाव असून त्याने अनेक तरुणांना तब्बल 5 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. ओमकार महेंद्र तलमले यांना आपण नासामध्ये ज्युनिअर शास्त्रज्ञ पदावर काम करत असल्याची खोटी बतावणी केली होती.

तरुणांना नासामध्ये नोकरी देण्याचे आमिष
तरुणांना नासामध्ये नोकरी देण्याचे आमिष
author img

By

Published : Aug 5, 2023, 1:37 PM IST

Updated : Aug 5, 2023, 3:07 PM IST

नागपूर : नासामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन 111 लोकांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. ओमकार महेंद्र तलमले असे या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे ओमकार महेंद्र तलमले हा एका खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. याबाबत नागपूर गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्युनिअर शास्त्रज्ञ असल्याची बतावणी : मी नासामध्ये ज्युनिअर शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहे. तेथे सध्या (R.R.SC) म्हणजेच रिजनल रिमोट सेनसिंग सेंटर नागपूरला फार मोठ्या प्रमाणात ऑफिस स्टाफची पदे रिक्त असून ती भरायची आहेत. माझी अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख आहे, असे सांगून ओमकार महेंद्र तलमले याने बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.

5 कोटी रुपयांचा गंडा : याप्रकरणी अश्विन अरविंद वानखेडे याने ओमकार महेंद्र तलमले याच्याविरुद्धात तक्रार दिली आहे. अश्विन वानखेडे आणि ओंमकार तलमले हे दोघेही ढोल ताशा पथकामध्ये होते, ते दोघे एकमेकांना ओळखत होते. ओंमकारने अश्विनला सांगितले होते तो स्वत: नासामध्ये कार्यरत आहे. Regional Remote Sensing Center) रिजनल रिमोट सेनसिंग सेंटर नागपूर येथे मोठ्या प्रमाणात ऑफिस स्टाफची पदे रिक्त आहेत. ती भरायची असल्याचे सांगितले. ओमकार हा तेथेच कार्यरत असल्याचे त्याने सांगितल्याने अश्विनने ओमकारवर विश्वास ठेवला होता. इतकेच नाही तर नोकरीसाठी तेथील अधिकाऱ्यांसोबत बोलू असेही त्याने अश्विनला सांगितले होते. यासर्व गोष्टीवर अश्विनने विश्वास ठेवला. त्यानंतर ओमकारने अश्विनकडे 2 लाख रुपयांची मागणी केली. नोकरीला लागण्यासाठी पैसे भरावे लागतील, त्यासाठी 2 लाख रुपये हवे असे सांगितले. नोकरी मिळेल या आशेने अश्विनने ओमकारच्या खात्यावर 2 लाख रूपये भरले. नासामध्ये खूप पदे रिक्त आहेत. तुमचे आणखी कोणी नातेवाईक मित्रमंडळी असतील त्यांना सुद्धा सांगा. त्यांनादेखील नोकरी लावून देईल, असे आश्वासन देत आरोपीने तब्बल 111 तरुणांकडून 5 कोटी 31 लाख 70 हजार रूपये उकळले.

बनावट कार्यालयाच्या नावे फसवणूक: आरोपी ओमकार महेंद्र तलमलेने गंडा घातल्याचे काहीं तरुणांना जेव्हा संशय आला तेव्हा त्यांनी R.R.S.C. (Regional Remote Sensing Center) नागपूर या कार्यालयाबाबत विचारपूस केली. त्यानंतर ओमकारचा आणि R.R.S.C. (Regional Remote Sensing Center) नागपूरचा कोणताही संबंध नसल्याचे तरुणांना समजले.

गुन्हा दाखल : ओमकार तलमलेने 9 एप्रिल 2020 पासून ते 25 जुलै 2023 पर्यंत अश्विनसह 111 लोकांची फसवणूक केली आहे. ओमकारने या तरुणांकडून 5 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांची वेगवेगळ्या बँक खात्यात घेतली होती. ज्या मुलांना पैसे दिले होते त्यांना ओमकारने रिजनल रिमोट सेनसिंग सेंटर, वाडी, नागपूर येथे ऑफिस स्टाफ (क्लास बी), ऑफिस ऍडमिन, सिनीअर एडविन या पदावर सरकारी नोकरी लावून देतो,असे सांगितले होते. तसेच काही मुलांना खोटे अपॉइंटमेन्ट लेटर ईमेल द्वारे पाठवले होते. दरम्यान आरोपी ओमकार महेंद्र तलमलेच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-

  1. Nagpur Murder News : नागपूर पुन्हा हादरले! महिलेची दगडाने ठेचून हत्या; दोन दिवसात तीन घटना
  2. Businessman Online Game Cheating: ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून व्यापाऱ्याची फसवणूक; बुकीच्या घरातून करोडोंचे घबाड जप्त

Last Updated : Aug 5, 2023, 3:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.