ETV Bharat / state

दारू पिण्याच्या वादातून गुंडाचा खून; आरोपी अटकेत - नागपूर खून बातमी

दारू पिण्याच्या वादातून एका गुंडाचा खून झाल्याची घटना उत्तर नागपूर परिसरात घडली आहे. शैलेश ऊर्फ वांग्या देशभ्रतार (३२) असे या गुंडाचे नाव आहे.

murder-of-goons-over-a-drinking-dispute-in-nagpur
दारू पिण्याच्या वादातून गुंडांचा खून; आरोपी अटकेत
author img

By

Published : Oct 23, 2020, 5:08 PM IST

नागपूर - दारू पिताना उद्भवलेल्या वादातून एका गुंडाचा खून झाल्याची घटना उत्तर नागपूर परिसरातील कपिल नगर भागात घडली आहे. शैलेश ऊर्फ वांग्या देशभ्रतार (३२) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी शैलेशच्या खून प्रकरणात त्याचा मित्र राकेश पटेल याला अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे, शैलेशवर शहरात अनेक गुन्हे नोंद आहेत. शैलेश गेल्या काही दिवसांपासून राकेशला जीवे करण्याची धमकी देत होता. त्यातच उद्भवलेल्या वादातून राकेशने शैलेशचा खून केला असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या आठवडाभरात कपिल नगर भागातच खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत.

पोलीस निरीक्षक मुख्तार शेख यांची प्रतिक्रिया

या प्रकरणातील शैलेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. लॉकडाऊनपूर्वी तो रिक्षा चालवायचा, मात्र लॉकडाऊननंतर काम नसल्याने तो कपिल नगर परिसरात दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात होता. दारूचे प्रचंड व्यसन असलेला शैलेश कुणालाही जीवे मारण्याची धमकी देत असत. कुणालाही क्षुल्लक कारणावरून मारहाण देखील करायचा त्यामुळे कपिल नगर परिसरात त्याची गुंडगिरी वाढू लागली होती. खून प्रजारणातील आरोपी राकेश पटेल याला देखील शैलेश जीवे मारण्याची धमकी देत होता.

राकेश आणि शैलेश हे दोघे काल एकत्र बसून दारू प्यायले. त्यावेळी दारू जास्त झाल्याने शैलेश त्याच ठिकाणी झोपी गेला. त्यावेळी राकेशने एक भला मोठा दगड शैलेशच्या डोक्यात घातला. ज्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती समजताच कपिल नगर ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर लगेचच पोलिसांनी शैलेशचा खून केल्या प्रकरणी राकेश पटेल याला अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.