ETV Bharat / state

मनपा आयुक्तांची पाचपावली कोविड सेंटरला अचानक भेट, उपलब्ध सुविधांचा घेतला आढावा - mnc Commissioner Visit to Pachpavli Maternity

पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ‘हाय रिस्क’ रुग्णांचे प्राधान्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची लवकरात लवकर चाचणी केली जावी, असे निर्देश आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

आयुक्त राधाकृष्णन बी.
कोविड सेंटरला भेट देताना आयुक्त राधाकृष्णन बी.
author img

By

Published : Sep 3, 2020, 9:01 PM IST

नागपूर- उपराजधानी नागपुरात कोरोनाचा दररोज होत असलेला उद्रेक बघता आज महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पाचपावली कोविड केअर सेंटर, पाचपावली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाचपावली सुतिकागृहला अचानक भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा हे देखील उपस्थित होते.

शहरात रुग्ण संख्या वाढत असताना कोविड केअर सेंटरला उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी आढावा घेतला. शहरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चाचणींची संख्या आणि वेग वाढवने आवश्यक आहे. या उद्देशाने मनपा आयुक्तांनी शहरातील कोविड चाचणी केंद्रांची संख्या वाढवली. मात्र, यासोबतच चाचणी करताना योग्य खबरदारी घेतली जात आहे अथवा नाही, निर्धारित वेळेतच चाचणी केली जाते का ? चाचणी करण्यात येणाऱ्या नागरिकांकडून नियमांचे पालन करवून घेतले जाते का ? या सर्व बाबींची पाहणी करण्यासाठी आयुक्त राधाकृष्णन बी. व अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी आकस्मिक भेट दिली.

कोविड केअर सेंटर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सुतिकागृहमध्ये चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे गरजेचे आहे. पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कामध्ये आलेल्यांचे जलद पद्धतीने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करण्यासाठी ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’ तैनात करण्यात आली आहे. या टिमने आपली कार्यपद्धती वेगवान करण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ‘हाय रिस्क’ रुग्णांचे प्राधान्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची लवकरात लवकर चाचणी केली जावी, असे निर्देश यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

हेही वाचा-महानगर पालिकेच्या ६६ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’, मनपा आयुक्तांचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.