नागपूर - भाजपा नेते किरीट सोमय्या रोज दिवस रात्र ट्विटर वर बोलतात. अक्षरशः ते उलटी करतात आणि रायता पसरवतात. नंतर मात्र त्यांनाच ती घाण स्वच्छ करावी लागते, असं म्हणत शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी किरीट सोमय्यावर टीका केली आहे. त्या आज नागपुरात पत्रकारांसोबत बातचीत करताना बोलत होत्या. शिवसंपर्क अभियानासाठी नागपूरात आल्या आहेत.
संजय राऊत तीन दिवस नागपुरात - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या विरोधात मुंबईत रान उठवले आहे. तर फडणवीस यांची कोंडी करण्याच्या उद्देशाने शिवसेनेकडून त्यांच्या होमटाऊन मध्ये फिल्डिंग लावण्याचे काम सुरू झाले आहे. शिवसेनेचे राजसभा खासदार संजय राऊत सलग तीन दिवस नागपुरमध्ये तळ ठोकून होते. कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेऊन ते मुंबई परत जाताचं शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी नागपुरात सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी आज त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्राच्या तपास यंत्रणांसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आमदारांना घर देण्यात गैर काय - सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत घर मिळतं असले तर त्यात चूक काय आहे. राज्यातील काही ठराविकचं आमदार श्रीमंत आहेत. श्रीमंत आमदारांचा टक्का फार कमी आहे. मात्र बहुतांश आमदारांची आर्थिक स्थिती फार चांगली नाही अश्या सर्व आमदारांना हक्काचे घर मुंबईत घर मिळालीत, त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघातून येणाऱ्या गरजू लोकांची सोय होईल असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.