पुलवामात चकमक : 3 दहशतवादी ठार, एका जवानाला वीरमरण
श्रीनगर - पुलवामा येथील दलीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. तर या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाच्या एका जवानालाही वीरमरण आले असून २ जवान जखमी झाल्याचे समजते. त्यामुळे पुलवाम्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
मुंबईच्या सनी पवारनं न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये पटकावला सर्वोतकृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार
मुंबई - मुंबईच्या कलिनाजवळील कुची कर्वेनगर या झोपडपट्टी भागात राहाणाऱ्या ११ वर्षीय मुलाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सनी पवार असं या मुलाचं नाव आहे. सनीने १९ व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोतकृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार पटकवला आहे. वाचा सविस्तर
'पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश होण्यासाठी निवडणूक आयोगाने अध्यादेश काढण्याची परवानगी द्यावी'
मुंबई - मराठा आरक्षणानुसार पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला न्यायालयाने नकार दिल्याने, मराठा समाजातील शेकडो विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न टांगणीला लागला आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पत्र लिहले असल्याची माहिती काल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. वाचा सविस्तर
वैद्यकीय प्रवेशाच्या प्रश्नावर सरकारपुढे पेच , अध्यादेशाला खुल्या वर्गातून विरोध...
मुंबई- मराठा आरक्षणानुसार पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश मिळावा म्हणून गेले १० दिवस मराठा विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षण देण्यासाठी राज्य सराकार आरक्षण काढण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाला धरुन राज्यसरकारने अध्यादेश काढल्यास त्या अध्यादेशाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे खुल्या वर्गातील विद्यार्थी आणि पालकांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर
मदत मागणाऱ्या तरुणीचा विनयभंग, पुण्यातील कॅम्प परिसरातील घटना
पुणे - कॅम्प परिसरात पत्ता शोधण्यासाठी मदत मागणाऱ्या तरुणीचा एका व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्या व्यक्तीचा शोध सुरु आहे. वाचा सविस्तर