ETV Bharat / state

नागपूरात साडेसात हजारांवर कोरोनाचे सक्रिय रुग्ण, नवीन बाधितांची घट

नागपूर जिल्ह्यात 329 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 993 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : May 29, 2021, 10:33 PM IST

नागपूर - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट झालेली आहे. एप्रिल महिन्याच्या सर्वाधिक असलेल्या सक्रिय रुग्णाच्या केवळ 10 टक्के रुग्ण हे आजच्या घडीला जिल्ह्यात आहे. नागपूर शहरातील एका झोनमध्ये जितके रुग्ण मिळत होते तेवढे आता जिल्ह्यात मिळत आहेत. मागील 24 तासांत 329 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून सक्रिय रुग्ण हे साडेसात हजाराच्या घरात आहेत. 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील 24 तासातील आढावा

नागपूर जिल्ह्यात शनिवारी (दि. 29 मे) 13 हजार 441 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 329 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागात 224 तर ग्रामीण भागातील 164 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच 14 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. यामध्ये शहरी भागात 5, ग्रामीण भागात 5 तर जिल्हाबाहेरील 4 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. तेच 993 जणांपैकी शहरात 597 तर ग्रामीण 396 जण कोरोनामुक्त झाले आहे. यात 2 हजार 389 हे रुग्णालयात उपचार घेत असून 5 हजार 80 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये (गृह अलगीकरण) आहे.

आतापर्यंतची परिस्थिती

दुसऱ्या लाटेत 78 हजारांपर्यंत रुग्णसंख्या जाऊन पोहोचली असताना सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन आता 7 हजार 478 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 73 हजार 929 जण रुग्ण कोरोनाबाधित झाले आहे. यातून 4 लाख 57 हजार 572 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. यात मृत्यूचा आकडा हा 8 हजार 879 वर जाऊन पोहोचली आहे. नागपुरात बरे होण्याचा दर हा 96.55 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.

सहा जिल्ह्यात बधितांची संख्या 1 हजारांच्या घरात, 35 जणांचा मृत्यू

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 2 हजार 439 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 1 हजार 16 जण नव्याने कोरोनाबाधित मिळून आले आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील 35 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. यात बाधितांच्या तुलेनेत 1 हजार 423 अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहे. यात नागपूरचा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 2.1 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 4.30 टक्क्यांवर आला आहे.

हेही वाचा - नागपुरात बिबट्या दिसल्याच्या बातमीने खळबळ, शोध मोहीम सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.