ETV Bharat / state

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला कोरोनाचा विळखा; जिल्हाधिकाऱ्यांसह ५० कर्मचाऱ्यांना लागण - नागपूर कलेक्टर ऑफिसमध्ये कोरोना

शहरातील कोरोना स्थिती गंभीर असताना आता जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोना चांगलाचा फैलावला असल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत ५० कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय कार्यालयातील एका शिपाईचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Sep 19, 2020, 12:25 AM IST

नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच आता शासकीय कार्यालयातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता प्रादुर्भाव देखील वाढतच चालला आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर हळूहळू जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारीही पॉझिटिव्ह येत आहेत. आत्तापर्यंत ५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी आवश्यक असेल तरच कार्यालयात यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

शहरातील कोरोना स्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालयातही कोरोना फोफावत असल्याचे चित्र आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर ते गृह अलगीकरणात आहेत. मात्र, कार्यालयात कोरोना फैलाव वाढत चालला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ५० कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय कार्यालयातील एका शिपाईचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे.

हेही वाचा - नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवश्यक असेल तरच नागरिकांनी कार्यालयात यावे, अनावश्यक रित्या येणे टाळा, असे आवाहनही करण्यात येत आहे. या कार्यालयात दररोज अनेक नागरिक प्रशासकीय कामकाजासाठी येत असतात. अशात कार्यालयात वाढता कोरोना संसर्ग नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. असे असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्वच खबरदारी बाळगली जात आहे. कार्यालयात मोजक्याच माणसांना प्रवेश दिला जातो. शिवाय वेळोवेळी परिसर सँनिटाईझ केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनीही कार्यालयात येताना स्वतःची काळजी घ्यावी. शिवाय कार्यालयात न येता फोनव्दारे किंवा ऑनलाईन पद्धतीनेच कामे करून घ्यावीत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी केले आहे.

हेही वाचा - कुटुंब व शहरासाठी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळा; महापौर संदीप जोशी यांचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.