ETV Bharat / state

नागपुरात ६०० पेक्षा जास्त निवासी डॉक्‍टर संपावर; रुग्णांचे हाल

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय(मेयो) येथील रूग्णांचे हाल होत आहेत. सध्या नागपुरात ६०० पेक्षा जास्त निवासी डॉक्‍टर संपावर आहेत. त्यामुळे ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण ३० स्थानिक डॉक्टर, काही प्राध्यापक, इंटर्न डॉक्टर आणि एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहेत.

नागपुरात ६०० पेक्षा जास्त निवासी डॉक्‍टर संपावर
author img

By

Published : Aug 7, 2019, 10:19 PM IST

नागपूर - राज्यातील स्थानिक निवासी डॉक्टर बुधवारपासून संपावर आहेत. याचा फटका नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाला(मेयो)बसला आहे. रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर बेमुदत संपावर गेले आहेत.

नागपुरात ६०० पेक्षा जास्त निवासी डॉक्‍टर संपावर
शासनातर्फे निवासी डॉक्टरांना दिले जाणारे वेतन ३ महिन्यांपासून मिळालेले नाही. पूर्ण वेळ वैद्यकीय सेवा देऊन देखील उदरनिर्वाहासाठी पैसेच मिळत नसतील, तर डॉक्टरांनी काय करावे? असा प्रश्न निवासी डॉक्टरांनी केला आहे. निवासी डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा आंदोलन सुरूच राहिल. असा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे.
मध्य आशियातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय नागपूरचे आहे. दररोज ४ हजार रुग्ण येथे उपचारासाठी येतात. येथील निवासी डॉक्टरांची संख्या ५४० आहे. त्यापैकी ४१० डॉक्टर हे बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण ३० स्थानिक डॉक्टर, काही प्राध्यापक, इंटर्न डॉक्टर आणि एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहेत. अशीच स्थिती मेयोची देखील आहे. मेयोचे २०० निवासी डॉक्टर देखील संपावर गेले असून, २० स्थानिक डॉक्टरांवर ७०० रुग्णांची जबाबदारी आहे. निवासी डॉक्टरांचा संप असाच सूरू राहिला, तर रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होईल.

Intro:नागपुरात ६०० वर निवासी डॉक्‍टर संपावर; रुग्णांना।मोठा फटका

आजपासून राज्यातील स्थनिक निवासी डॉक्टर संपावर असून याचा फटका नगपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय(मेडिकल) तसच इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाला(मेयो) देखील बसलाय रूग्णालयातील निवासी डॉक्‍टर बेमुद्दत संपावर गेले आहेत. शासनातर्फ़े निवासी डॉक्टरांना जे स्टायफंड दिले जाते ते ३ महिन्या पासून डॉक्टरांना मिळाले नाहीत . पूर्ण वेळ वैदकीय सेवा देऊन देखील उदरनिर्वाह साठी पैसेच मिळत नसतील तर डॉक्टरांनी काय करावं असं सवाल देखील डॉक्टरांनी उपस्थित केलाय तसच मार्ड डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करत शासनाने या वर कायमस्वरूपी निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन सुरूच रहिल असा पवित्रा डॉक्टरांनी घेतलाय.Body:मेडिकल हे मध्य एशियतातील सर्वात मोठं शासकीय रुग्णालय आहे रोज ४ हजार रुग्ण इथे उपचारा करिता येतात निवासी डॉक्टरांची संख्या ५४० आहे त्यातील ४१० डॉक्टर हे बेमुदत संपावर गेलेत त्या मुळे ४ हजार ओपीडी आणि ईतर रुग्ण हे ३० स्थानिक डॉक्टर, काही प्राध्यापक ,इंटर्न डॉक्टर आणि एमबीबीएस च्या अंतिम वर्षाच्या डॉक्टरांन वर अवलंबून आहेत.Conclusion:आशीच स्थिती मेयो ची देखील आहे तिथे दररोज ७०० ओपीडी येतात आणि २०० निवासी डॉक्टर आहेत मात्र ते देखील संपावर गेले असून २० स्थानिक डॉक्टरांवर ७०० रुग्णांची जवाबदारी आहे. डॉक्टरांचा संप असाच सूरू राहिला तर त्यांचा तुटवडा भरून काढणे कठीण जाईल आणि रुग्णांची मोठया प्रमाणत गैरसोय होईल

- बाईट : १)मुकुल देशपांडे मार्ड अध्यक्ष नागपूर
२) सजल मित्रा, अधिष्ठता, शासकीय वैद्यकीय रुग्णालय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.