नागपूर - उद्या मुंबईत मनसेचा महामेळावा होतोय, मनसेच्या पंचरंगी ध्वजासोबत मनसेचे धोरणं देखील बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सत्तेत पराभव मिळालेल्या मनसेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारवर मोठे ताशेरे ओढले होते. विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. परंतु, सत्ता स्थापेनेच्या राजकीय भूकंपानंतर राजकीय समीकरणं बदललेली दिसत आहेत.
हिंदुत्ववादी विचारांवर चालणाऱ्या सेनेने धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ मागितली आणि सत्ता स्थापन केली. या सर्व घडामोडीत चर्चेत नसणारा मनसे पक्ष आता चर्चेत आला आहे. मनसे आता २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी हिंदुत्ववादी पक्षाचे धोरण हाती घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उपराजधानीत सेनेचा आणि मनसेचा फार दबदबा नाही, पण उद्याच्या मनसे महाधिवेधनानंतर मोर्चे बांधणी केली जाईल.
हेही वाचा - मनसेच्या महाअधिवेशनाचे पोस्टर लाँच... 'या' तारखेला धडाडणार राज ठाकरेंची तोफ
उपराजधानीत पक्षाची पाळेमुळे पसरविण्याचे काम केले जाईल. भाजप-मनसेला साथ देत राजकीय घडामोडीत बदल करण्याचा प्रयत्न करेल. परंतु, सत्तेत असलेल्या सेनेवर वरचढ होणे मनसेसाठी सोप नाही, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.
हेही वाचा - नागपूरमध्ये 65 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या