ETV Bharat / state

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मद्यपींनी दिला त्रास; सभागृहात केली तक्रार

author img

By

Published : Dec 18, 2019, 5:39 PM IST

Updated : Dec 18, 2019, 7:46 PM IST

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज सभागृहात आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत चिंता व्यक्त केली. आमदार निवासातील मद्यपी टोळके त्रास देत असल्याची तक्रार शेट्टी यांनी केली.

nagpur
प्रतिकात्मक

नागपूर- अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आमदार निवासातील मद्यपी टोळके आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार केली आहे. आज सभागृहात चर्चा सुरू असताना शेट्टी यानी हा मुद्दा मांडला व आमदारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.

सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यभरातले आमदार नागपूरच्या आमदार निवासात राहण्यासाठी आले आहेत. वर्षभर मोकळे असलेल्या या आमदार निवासाला दारूड्यांनी आपला अड्डा बनवला आहे. आता आमदार आले तरी दारूडे काही तिथून जायला तयार नाहीत. यामुळे आमदारांना या मद्यपींपासून त्रास होत असल्याचे समोर आले आहे. आमदार निवासातील मद्यपी टोळके आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सभागृहात केली आहे. आमदार शेट्टी यांना ४ अज्ञात व्यक्तींनी दारू पिण्यासाठी ५०० रुपये मागितले. आमदार कल्याणशेट्टी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दारूड्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी आमदारांच्या मदतीसाठी पोलीस आमदार निवासात उपस्थित नसल्याचे सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा- 'काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?'

Intro:Body:mh_mum_nagpur_mla_mumbai_7204684

आमदारांनाही दारूड्यांचा त्रास...

नागपूर:सामान्य माणूस दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड देत असतो. मद्यपी टोळक्यांचा उच्छाद सामान्य माणसांना नवीन नाही. राज्याच्या अनेक भागांमध्ये मद्यपीचे टोळके सामान्यांना त्रास देत असतात. त्यामुळे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांना सामान्य माणसासारखे त्रास नसतात, अशी अनेकांची समजूत असते. मात्र आमदारांनाही दारूड्यांचा त्रास सहन करावा लागतो, हे सांगितले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यभरातले आमदार नागपूरच्या आमदार निवासात राहण्यासाठी आले आहेत. वर्षभर मोकळे असलेल्या या आमदार निवासाला दारूड्यांनी आपला अड्डा बनवला आहे. आता आमदार आले तरी दारूडे काही तिथून जायला तयार नाहीत. या दारूड्यांनी चक्क आमदारांनाच दारूसाठी पैसे मागितले आहेत.

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आज सभागृहात आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत चिंता व्यक्त केली. आमदार निवासातील मद्यपी टोळके त्रास देत असल्याची तक्रारच शेट्टी यांनी केली. आमदार शेट्टी यांना ४ अज्ञात इसमांनी दारू पिण्यासाठी ५०० रुपये मागितले. आमदार शेट्टी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दारूड्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी आमदारांच्या मदतीसाठी पोलीस आमदार निवासात उपस्थित नसल्याचे सचिन शेट्टी यांनी सांगितले.

Conclusion:
Last Updated : Dec 18, 2019, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.