नागपूर - करडईचे 50 क्लस्टर तयार करणार असून यापैकी दहा क्लस्टर माझ्या मतदारसंघात तयार करणार आहे, अशी माहिती मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे. ( Vijay Wadettiwar on Safflower Cluster ) महाज्योतीला बदनाम करू नये. काही तक्रारी असल्यास आम्हाला लेखी स्वरूपात कळवाव्या. आम्ही त्यात सुधारणा करू, असेही ते म्हणाले. ( Vijay Wadettiwar on Mahajyoti Company ) ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
महासंदर्भात लेखी तक्रारी द्या -
सेमिनरी हिल्स परिसरात महाज्योतीसाठी मोठा कॅम्पस उभारायचा असल्यामुळे यासाठी पाच एकर जागेची मागणी केली आहे. महाज्योतीला बदनाम करू नये. काही तक्रारी असल्यास आम्हाला लेखी स्वरूपात कळवाव्या. आम्ही त्यात सुधारणा करू. महाज्योती संस्थेकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी करडई क्लस्टर योजना 16 हजार हेक्टरवर विदर्भात राबवणार आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करून प्रक्रिया करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास या माध्यमातून मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.
सारथी आणि बार्टीत विद्यार्थी असताना बजेट जास्त आहे. ओबीसी जास्त विद्यार्थी असताना बजेट मात्र कमी आहे. करडई क्लस्टरच्या माध्यमातुन ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न असणार आहे. परीक्षेसंदर्भात जागा भरताना माझ्या जवळचे लोक घेतले म्हणून आरोप होऊ नये, यासाठी भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी. उशिरा झाली तरी चालेल असेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले.