नागपूर - कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मंत्री-एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या लक्षवेधीवर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : विधानसभेचे कामकाज सुरू; औचित्याच्या मुद्द्यावर चर्चा
राज्यात डम्पिंग ग्राऊंडवर कचरा साचवल्याने मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तरीसुद्धा कचरा डम्पिंग करण्याचे काम येथे सुरू असल्याचे सांगत आमदार जगन्नाथ शिंदे यांनी लक्ष वेधले.
कचऱयाचा प्रश्न केवळ एका शहराचा नाही. राज्यात 23 हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यातील 100 टक्के कचरा संकलन होतो. पण, 56 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे यात कचरा डम्पिंग करता येणार नसून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा - विधानपरिषद LIVE : हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस; मंत्र्यांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा
यात स्वच्छ भारत अभियानातून 383 शहरांसाठी 3 हजार 138 कोटी रुपयांचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर केला आहे. याचा डीपीआर तयार असून त्यात गरजेनुसार सुधारणा केली जाईल. तसेच या घनकचऱयाचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे. या डम्पिंगच्या शेजारीच वृक्ष लागवड करण्यासाठी आराखडा तयार करण्याची गरज आहे. यासाठी राज्यस्तरीय घनकचरा व्यवस्थापन कृती आराखडा समितीची गरज पाहता त्यासाठी समिती गठीत करू, असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.