नागपूर - यंदाचे पहिले सूर्यग्रहण २१ जूनला दिसणार आहे. हे पहिलेच ग्रहण असल्याने त्याचे महत्त्व आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण जेष्ठ महिन्यात आले असल्याने ज्येष्ठ मंडळींना त्रास सहन करावा लागेल, तर सात्विक प्रवृत्तीच्या लोकांसाठी देखील क्लेशदायक ठरणार आहे. मिथून राशीत चंद्रमा असल्याने वृषभ, मिथून आणि कर्क राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल, तर मेष, सिंह आणि कन्या राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण फायद्याचे ठरणार असल्याचे ज्योतिष अभ्यासक मिलिंद केकरे यांनी सांगितले.
कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने ते भारतातून पाहायला मिळणार आहे. सकाळी १० वाजून १२ मिनिटे ते दुपारी १ वाजून ४४ मिनिटे इतका सूर्यग्रहणाचा कालावधी असेल. साधारण ३ तास ३२ मिनिटे सूर्यग्रहण असणार आहे. सूर्यग्रहण म्हणजे खगोलीय घटना आहे. चंद्र पृथ्वीपासून सर्वाधिक अंतरावर असतो, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये सूर्य एखाद्या अंगठी सारखा दिसतो. ज्या भागात चंद्रामुळे सूर्य झाकला जातो. खगोलशास्त्रात सूर्यग्रहणाला अनन्य साधारण महत्व असते. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात सुद्धा सूर्यग्रहणाला विशेष महत्व प्राप्त असल्याचे ज्योतिष अभ्यासक मिलिंद केकरे यांनी सांगितले.
राज्याच्या राजकारणावर सुद्धा या सूर्यग्रहणाचा प्रभाव दिसून येणार आहे. बसलेली घरी विस्कटण्याची शक्यता आहे, असे भाकीत देखील त्यांनी व्यक्त केले. आपल्या देशाचे राजकारण पुढील काळात ढवळून निघणार आहे. तसेच जगातील पातळीवर सुद्धा याचा प्रभाव दिसून येणार आहे. देशात कोरोनाचे संकट वाढीस लागले असताना पुढील काळात नैसर्गीक संकटांना देखील तोंड द्यावे लागणार असल्याचे भाकीत केकरे यांनी वर्तवले आहे.
सूर्यग्रहणाचा कुप्रभाव सुमारे १८० दिवसांपर्यंत राहू शकतो, अशी माहिती ज्योतिष्य शास्त्राचे ज्ञान असलेले सुरेशचंद्र वशिष्ठ यांनी दिली आहे. उद्याचे सूर्यग्रहण देशाच्या अर्थकारणावर सुद्धा प्रभाव टाकणारे असणार आहे. १ जुलै ते १२ नोव्हेंबरचा काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिता स्वरणीम काळ असणार आहे. मात्र, त्यानंतर त्यांच्यासमोरील अडचणी वाढतील, असेही भाकीत त्यांनी वर्तवले आहे.