ETV Bharat / state

Nagpur ACB Action: विधिमंडळात प्रश्न उपस्थित होऊ न देण्याकरिता कोटीच्या लाचेची मागणी, जाणून घ्या नेमके प्रकरण

नागपूर येथे विधानपरिषद सदस्य वजाहत मिर्झा यांच्या नावाने 25 लाखांची लाच घेताना दोघांना नागपुरात रंगेहाथ अटक करण्यात आले आहे. विधीमंडळात प्रश्न उपस्थित न करण्यासाठी दोघांनी एका शासकीय अधिकाऱ्याला एक कोटींची लाच मागितली होती.

Nagpur ACB Action
एक कोटी लाचेची मागणी
author img

By

Published : Mar 29, 2023, 9:45 AM IST

नागपूर: महिला अधिकाऱ्याच्या लैंगिक छळ प्रकरणात विधिमंडळात प्रश्न उपस्थित न करण्यासाठी विधान परिषद सदस्य आमदार वजाहत मिर्झा यांच्या नावाने अमरावती शहरातील दोन भामट्यांनी चक्क एक कोटी रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणात नागपूर येथील लाचलुचपत विभागाने कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीने लढवली शिक्षक मतदार संघ निवडणूक: या गंभीर गंभीर प्रकरणात नागपूर येथील लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान अमरावती शहरातील स्वतःला शिक्षकांचा नेता म्हणून घेणारा शेखर भोयर आणि अमरावती एमआयडीसीमध्ये टेक्निशियन पदावर कार्यरत असणारा दिलीप खोडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दिलीप खोडे याला लाच स्वीकारताना अटक करण्यात आले आहे. तर शेखर भोयर हा फरार झाला आहे. शेखर भोयर याने अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक देखील लढवली होती. या निवडणुकीत त्याने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.

असे आहे संपूर्ण प्रकरण: या प्रकरणात लाच लुचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करणाऱ्या नागपूर येथील आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात त्याच्याच विभागातील महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याची तक्रार आहे. हा विषय आमदार वजाहत मिर्झा यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. हाच मुद्दा धरून एमआयडीसी अमरावती येथील टेक्निशियन दिलीप खोडे आणि शेखर भोयर या दोघांनी तुमचा विषय उपस्थित होणार नाही, असे सांगितले. तक्रारीवर कुठलीही कारवाई होणार नाही. संपूर्ण प्रकरण परस्पर मिटविले जाईल अशी बतावणी करून यासाठी प्रत्येकी 50 लाख असे एकूण एक कोटी रुपये मागितले. ही रक्कम फार जास्त होत असल्याने संबंधित अधिकाऱ्याने यासाठी नकार दिला. मात्र दोन्ही आरोपींनी 25 लाख रुपयात हे प्रकरण निपटविण्याची तयारी दर्शविली. या प्रकरणात आपल्याला लाज द्यायची नसल्याचे संबंधित अधिकाऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

लाचलुचपत विभागाने रचला सापळा: प्रकरणात विभागाने संबंधित अधिकाऱ्याची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे संबंधित अधिकारी 25 लाख रुपये घेऊन मंगळवारी सायंकाळी नागपूर येथील रवी भवन येथे गेले. त्या ठिकाणी दिलीप खोडे हा संबंधित अधिकाऱ्याकडून 25 लाख रुपयांची रक्कम स्वीकारत असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केल्याचे कळताच या प्रकरणातील आरोपी शेखर भोयर फरार झाला. तर दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आमदार वजाहत मिर्झा यांचे नाव का घेण्यात आले, याबाबत देखील दोघांचीही चौकशी केली जाणार आहे. पोलीस निरीक्षक सचिन मते निलेश उरकुडे, प्रीती शेंडे, सुशील याद, हरीश गांजरे, बादल मांढरे, सुरज भोंगाडे, विनोद नायगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेहूी वाचा: Satara ACB Action एसीबीच्या कारवाईत लाचखोर तलाठी रंगेहाथ अडकला मंडलाधिकारी आला शरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.