ETV Bharat / state

NMC Election : नागपूर मनपात सत्ता अबाधित ठेवण्यासाठी भाजपने सुरू केले नगरसेवकांच्या कामाचे मूल्यांकन

नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या ( NMC Election ) दृष्टीने भारतीय जनता पक्षाने ( Bjp Nagpur ) जोरदार तयारी सुरू केली आहे. विद्यमान नगरसेवकांच्या पाच वर्षातील कामाचा रिपोर्ट कार्ड ( NMC Bjp Corporator Report Card ) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

NGP MUNICIPAL CORPORATION
नागपूर महानगर पालिका
author img

By

Published : Jan 31, 2022, 7:23 PM IST

Updated : Jan 31, 2022, 8:50 PM IST

नागपूर - नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या ( NMC Election ) दृष्टीने भारतीय जनता पक्षाने ( Bjp Nagpur ) जोरदार तयारी सुरू केली आहे. विद्यमान नगरसेवकांच्या पाच वर्षातील कामाचा रिपोर्ट कार्ड ( NMC Bjp Corporator Report Card ) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. शहरात केलेल्या विकासाच्या मुद्यावरच भाजप या निवडणुकीत उतरणार असल्याचं जवळजवळ निश्चितचं मानलं जातं आहे. त्यामुळे पाच वर्षात नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचे मूल्यांकन करण्यासाठी भाजपने अंतर्गत सर्व्हे सुरू केला आहे. एकूण पाच मुद्यावर सर्व्हे करण्यात येत आहे. भाजपचे जे विद्यमान नगरसेवक या सर्वेत पास होतील त्यांनाच पुन्हा संधी मिळणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

सत्ताधारी पक्षाचे नेते अविनाश ठाकरे याबाबत बोलताना

येत्या काळात नागपूरसह राज्यातील दहा महानगरपालिकेच्या निवडणूका होऊ घातलेल्या आहेत. गेल्या 15 वर्षांपासून नागपूर महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. भाजप शिवसेना युती सरकारमध्ये नागपूरला सत्ताकेंद्र म्हणून सुद्धा ओळख मिळाली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे दोन दिग्गज नेते नागपूरचं प्रतिनिधित्व करतात. एवढंच नाही तर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय देखील आहे. त्यामुळे नागपूर मनपावर सत्ता मिळवणे भाजपसाठी अस्तित्त्वाची नाही तर सन्मानाची लढाई असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजप ही निवडणूक हलक्या घेणार नाही असंच चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा - Shiv Sena Support to Utpal Parrikar : शिवसेनेचा उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा; पणजीमधून घेतला उमेदवार मागे, राऊत म्हणाले...

पाच मुद्यांवर आधारित सर्व्हे -

भारतीय जनता पक्षाने नगरसेवकांच्या कामाचे मूल्यांकन करताना एकूण पाच मुद्यांच्या आधारे सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये नगरसेवकाने या पाच वर्षात आपल्या प्रभागात कोणते विकास कामे केली? ते काम किती जन कल्याणकारी ठरले? नगरसेवक झाल्यानंतर त्या नगरसेवकाची प्रभागात पत किती आहे? प्रसिद्धी कमी झाली की वाढली? नगरसेवकाचे प्रभागातील नागरिकांसोबत संबंध कसे आहेत? यासह या पाच वर्षात त्या नगरसेवकाची एकूण कामगिरी कशी राहिली? या पाच मुद्यांवर सर्व्हे केला जात आहे.

महानगरपालिकेतील पक्षनिहाय स्थिती -

२०१७मध्ये प्रभाग पद्धतीने निवडणुक घेण्यात आली होती. नागपुर महानगरपालिकेतील 151 पैकी 108 जागा जिंकत भाजपने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली होती. तर काँग्रेसला केवळ 28 तर बसपाला 7, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले होते.

Last Updated : Jan 31, 2022, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.