ETV Bharat / state

Medical And Mayo Death Case : मेडिकल-मेयो मृत्यू प्रकरण; माजी मंत्री नितीन राऊतांनी केली पाहणी तर मनसेने डीनला धरलं धारेवर... - मेडिकलचे अधिष्ठाता राज गजभिये

Medical And Mayo Death Case : नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाचा नागरिकांमध्ये संताप असतानाच नागपूरच्या मेयो व मेडिकल रुग्णालयात (Medical Mayo Hospital) गेल्या तीन दिवसांत ६३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत (Congress Leader Nitin Raut) यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Medical And Mayo Death Case
मेडिकल-मेयो मृत्यू प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 7:36 PM IST

Updated : Oct 5, 2023, 10:53 PM IST

नागपूर Medical And Mayo Death Case : नागपूरच्या मेयो व मेडिकल रुग्णालयात मृत्यूचे आकडे अचानकपणे वाढल्यानंतर आता यावर जोरदार राजकारण देखील सुरू झालेलं आहे. काँग्रेस नेते नितीन राऊत (Congress Leader Nitin Raut) यांनी आज मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचा (Medical Mayo Hospital) धावता दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये (Raj Gajbhiye) यांना घेराव घातला. यावेळी मनसे नेत्यांनी डॉ. राज गजभिये यांना अक्षरशः धारेवर धरत मेडिकल रुग्णालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचून दाखवला आहे.

तीन दिवसांत तब्बल ६३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद : नागपूरच्या मेयो व मेडिकल या दोन शासकीय २४ तासात २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आकडे समोर आल्यानंतर आता तीन दिवसांत तब्बल ६३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती पुढे आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या १, २ आणि ३ तारखेला मेयो व मेडिकल रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत ६३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये मेडिकलमध्ये ४३ तर मेयो रुग्णालयात २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये दिल्या जात असलेल्या बातम्या चुकीच्या असून सरासरी पेक्षा मृत्यूचे आकडे वाढले नसल्याचा दावा मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी केला आहे.

नागपुरात नांदेडसारखी परिस्थिती नाही : मेयो आणि मेडिकल रुग्णालयातील औषधांचा तुटवडा असल्याने तीन दिवसांत ६३ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या मन विचलित करत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मेयो, मेडिकल रुग्णालयाची पाहणी केली. नितीन राऊत यांनी यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातून औषध हे मिळतं नसल्याचं कारण सांगितलं. त्यानंतर ते प्रसार माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, नागपुरात नांदेडसारखी स्थिती नाही. पण औषधांच्या तुटवड्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं, स्थानिक स्थरावरचं औषध खरेदीचे अधिकार दिले जावेत. रुग्णसंख्या वाढल्याने त्यानुसार पदभरती आणि रुग्णालयातील स्वच्छतेबाबत सरकारने लक्ष द्यावं अशी मागणी, नितीन राऊत यांनी केलीय.

आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यां मेडिकल रुग्णालयाचे डीन डॉ. राज गजभिये यांना घेराव घातला. तर मेडिकल रुग्णालयात अगदी सर्रासपणे सुरू असलेल्या भोंगळ कारभाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सरकारचा पगार घेऊन सुद्धा दिवसभर खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टराचे नाव घेत तक्रार केली. याकडे मेडिकल प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीला राज्याचे आरोग्य मंत्री जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे.

खासदारांविरुद्ध विद्यार्थी आक्रमक : (Nanded Hospital Death Case) नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावल्याप्रकरणी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्यावर नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात खासदार हेमंत पाटील यांनी माफी मागावी या मागणीसाठी राज्यभरातील डॉक्टर आक्रमक झाले आहेत. मेडिकल कॉलेजमध्ये मार्डच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -

  1. MP Hemant Patil on FIR : 'या' कारणामुळे मी आणि अधिष्ठातांनी स्वच्छतागृह केलं साफ, खासदार हेमंत पाटलांच स्पष्टीकरण
  2. Nanded Hospital Death Case : मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल; रुग्णालयातील मृतांची संख्या 41 वर
  3. Nanded Hospital Death Case : नवजात बाळासह आता आईनंही सोडला श्वास; नातेवाईकांचा आक्रोश

रुग्णालयात माजी मंत्री नितीन राऊतांनी केली पाहणी

Last Updated : Oct 5, 2023, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.