नागपूर: यश माने हा विद्यार्थी बुधवारी रात्री घरातून निघून गेला. त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांनी आणि मित्रांनी रात्रभर त्याचा शोध घेतला. पण तो कुठेही सापडला नाही. अखेर यशचे कुटुंबीय यश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी मानकापूर पोलिस ठाण्यात गेले. तेव्हा एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती मनकापूर पोलिसांना समजली. त्यानंतर यशच्या कुटुंबातील काहींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह यशचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. यशच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
यश तणावात होता: यश हा अभ्यासात हुशार होता. तो मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचा विद्यार्थी होता. प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या यशचा नीट अभ्यास होत नव्हता. त्याचे लक्ष लागत नसल्याने तो तणावात राहू लागला. यशाचा कुटुंबियांनी त्याला धीर दिला होता. मात्र, परीक्षा तोंडावर आली आणि अभ्यास झाला नसल्याच्या तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
आजारपणाला कंटाळून: मूळव्याधीच्या आजाराला कंटाळून नागपूरात एका तरुणाने हॉस्पिटलच्या बाथरूममध्येच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विवेक बाबाराव कुणकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. विवेकला अनेक दिवसांपासून मूळव्याधचा त्रास होता म्हणून त्याने खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया देखील करून घेतली होती. मात्र, तरीदेखील त्रास कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने त्याने हॉस्पिटलच्या बाथरूम मध्ये आत्महत्या केली.
पोलीसांना घाबरुन पळाला : या आधीही नागपूर येथे आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बघतात भांबवलेल्या आरोपी तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हाच प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला. ही घटना नागपूरच्या उप्पलवाडी येथे घडली होती. इमरान खट्टा ( वय २६) असे मृतकाचे नाव असून त्याच्यावर गोवंश तस्करीचा आरोप होता. इमरान खट्टा विरोधात नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलीस ठाण्यात गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेण्याकरिता देवलापार पोलिसांचे एक पथक नागपुरमध्ये आले होते. दरम्यान आरोपी इमरान खट्टा हा उप्पलवाडी या भागात लपून असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे देवलापार पोलीस उप्पलवाडी भागात दाखल झाले होते. इमरान खट्टा ज्या इमारतीत लपलेला होता, त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले ही बाब समजल्यानंतर इमरानने पळ काढला.