नागपूर - मुख्यमंत्री सहायता निधीप्रमाणे नागपूर महानगर पालिकेतील नवनियुक्त महापौर संदीप जोशी यांनी महापौर सहायता निधीची घोषणा केली आहे. या योजनेनुसार नागपुरातील गरजू खेळाडूंना आणि रुग्णांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.
हे वाचलं का? - दौंडमध्ये तरुणांच्या समयसूचकतेने वाचले मोराचे प्राण
पैशाअभावी नागपूर शहरातील अनेक प्रतिभावान खेळाडू मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्याचे अतोनात नुकसान होत असल्याची बाब लक्षात आला. त्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त महापौर संदीप जोशी यांनी महापौर निधीतून मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या रुग्णांवर उपचार होऊ शकत नाही. तसेच विविध कारणांमुळे शहरातील गरजूंची फरफट होत असते. अशा गरजूंना आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या धर्तीवर महापौर सहायता निधी उभारण्यात येईल.
यासंदर्भात कोणाला सहायता करायची यासाठी धोरण ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी ४ सद्स्यीय समितीचे गठन करण्यात येणार आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही समिती धोरण ठरवण्यात येईल. नववर्षाच्या प्रारंभी १ जानेवारीपासून महापौर सहायता निधी वाटपास सुरुवात होईल, असे महापौरांनी जाहीर केले.